नागपूरचा Dolly Chaiwala ते जगप्रसिद्ध चहावाला म्हणून रातोरात फेम मिळवणारा इंटरनेट सेन्सेशन डॉली चहावाल्याने चक्क जगातील सर्वोत्कृष्ट सॉफ्टवेअर कंपनीचे म्हणजेच मायक्रोसॉफ्टचे संस्थापक आणि मालक Bill Gates यांना आपल्या अनोख्या अंदाजने चहाचा आस्वाद घ्यायला भाग पाडले आहे.
कोण आहे हा डॉली चायवाला?
इंटरनेटच्या दुनियेत कोण, कधी, केव्हा तुमच्या स्टाईलचा व्हिडिओ बनवेल आणि इंटरनेटवर व्हायरल करेल याचा कुणालाच नेम नाही. अशाप्रकारे डॉली चायवाल्याच्या चहा बनवण्याच्या आकर्षक शैलीमुळे त्याने नेटकरांचे लक्ष वेधले आणि लाखोंच्या भरात त्याच्या व्हिडिओला पसंती येऊन तो देशभरात प्रसिद्ध झाला. डॉली चायवाल्याचे खरे नाव अजून तर अज्ञात आहे. नागपुरातील सदर भागातील जुन्या स्टेडियम जवळ डॉलीच्या चहाची टपरी लागते. आणि आश्चर्याचे म्हणजे डॉली चायवाल्याचे 9 लाख सबस्क्राईबर असलेले स्वतःचे यूट्यूब चैनल देखील आहे.
डॉली भाऊचा चहा पिऊन बिल गेट्स झाले इम्प्रेस.
बिल गेट्स यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवर डॉली चाय वाल्या सोबत चा व्हिडिओ पोस्ट करून सर्वांनाच अवाक सोडले. व्हिडिओमध्ये बिल गेट्स “वन चाय प्लीज” म्हणताना तर डॉली भाऊ आपल्या फेमस अंदाज ने चहा बनवताना दिसते आहे. बिल गेट्स यांनी इंस्टाग्राम वर व्हिडिओ शेअर करताना कॅप्शन लिहिले की,”भारतात तुम्ही जिथे पण जाणार तिथे तुम्हाला नाविन्य बघायला मिळेल. अगदी साधा चहा तयार करताना सुद्धा. “
कशी आणि केव्हा भेट झाली बिल गेट्स आणि डॉलीची?
बिल गेट्स हे भारतात अंबानी कुटुंबीयांच्या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवण्याकरिता आले आहेत. मात्र बिल गेट्स आणि डॉली चायवाला यांचा कोल्याब्रेशन कसे झाले याचा थांगपत्ता अजून कोणालाच लागलेला नाही. फक्त एका विदेशी व्यक्तीला भेटायचे आहे म्हणून डॉलीला हैदराबाद येथे बोलवण्यात आले होते. परंतु तो व्यक्ती कोण आहे याची कल्पनाही डॉलीला नव्हती. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर डॉलीला कळले की त्यांने कुणासाठी चहा बनवलेला आहे.
डॉली चाय वाला जॅक स्पॅरोचा भाऊ म्हणे!
हॉलीवुड एक्टर जॉनी डेप यांच्या 2017 मधील पायरेट्स ऑफ कॅरिबियन हा मूवी डॉलीने बघितला आणि स्वतःचा मेकओवर केला असे तो सांगतो. त्याच्या दिसण्यावरून त्याच्या केसांच्या स्टाईलवरून भारताचा जॅक स्पॅरो किंवा दुसरा जॅक स्पॅरो किंवा देसी जॅक स्पॅरो म्हणून सुद्धा त्याला ओळखतात. सुपरस्टार रजनीकांत यांचा तो खूप मोठा फॅन आहे.
कोण कोणत्या सेलिब्रेटींनी डॉलीच्या टपरीवर हजेरी लावली?
साउथ एक्टर नानी आपल्या ‘दसरा’ मूवी च्या प्रमोशनसाठी नागपूर मध्ये आले असताना त्यांनी डॉलीच्या टपरीवर भेट दिली. यासोबतच अनेक सेलिब्रेटी, वर्ल्ड फेमस ब्लॉगर, फुड ब्लॉगर डॉली चायवाल्याला भेट देत असतात. डॉली चायवाल्याला ‘लोकमत’ तर्फे आयोजित केला जाणारा सोशल मीडिया अवॉर्ड देखील मिळालेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना चहा पाजण्याची पसंती त्यानी दर्शवली आहे. यावरूनच डॉली चायवाला आता एक सेलिब्रिटी चहावाला बनलेला आहे, असे म्हणण्यात काही वावगं ठरणार नाही.