Bike Petrol Tips : दैनंदिन जीवनात कार मोटर बाईक वापरताना त्यात पेट्रोल डिझेल टाकणे हे अपरिहार्य आहे.पेट्रोल आणि डिझेल तसेच इतर पेट्रोलियम पदार्थ आणि पेट्रोलियम इंधनच्या वाढत्या किमतीमुळे प्रत्येक जण पेट्रोल पंपावर योग्य मात्रा मध्ये पेट्रोल डिझेल मिळावे यासाठी सजग असतो. नियमितपणे इंधनच्या चालू किमतीमध्ये आपण लिटर प्रमाणे पेट्रोल डिझेल भरत असतो.
पेट्रोल पंपावर वाहनामध्ये इंधन भरण्यासाठी अदा केलेल्या किमतीनुसार योग्य प्रमाणात इंधन मिळावा,हा प्रत्येकाची अपेक्षा असते. मात्र अनेकदा मनात ही शंका असते की,पेट्रोल पंपावर योग्य किंमत अदा करूनही कमी इंधन मिळू शकते. त्यामुळे आपण यासाठी विविध पर्यायातून या शंकेला वाव आहे किंवा नाही?हे जाणून घेऊया.
नेमक किती फिगर सांगून वाहनात इंधन भरावा?
पेट्रोल पंपावर गेल्यावर अनेकदा आपण पाहतो की अनेक लोक राउंड फिगर मध्ये जसे 100 किंवा 200 रुपयांचे पेट्रोल न टाकता त्याऐवजी 110 रुपये, 115 रुपये, 210 किंवा 225 रुपये या आकड्यांमध्ये पेट्रोल भरण्यास सांगतात.
Petrol,Diesel Rates. त्यामुळे हा प्रश्न नेहमी पडतो की, राउंड फिगर मध्ये पेट्रोल किंवा डिझेल टाकण्यास सांगितल्यावर कमी इंधन मिळते का ? जर सम आकड्यामध्ये मध्ये इंधन भरण्यापेक्षा विषम आकड्यांमध्ये इंधन टाकल्यावर काय होते?असे केल्याने आपल्याला फायदा मिळते का? या फिगर नुसार पेट्रोल पंपावरील मशीन कशी काम करते.हे पाहू या.
राऊंड फिगर मध्ये पेट्रोल टाकल्यास फसण्याची शक्यता?
नेहमी असे म्हटले जाते की पेट्रोल पंपावर 100 किंवा 200,300 अशा राउंड फिगर मध्ये पेट्रोल टाकल्यास यात फसवणुकीची शक्यता असते, यामागे नेमके काय कारण आहे,हे सर्व ग्राहकांना जाणण्याची उत्सुकता असते.
पेट्रोल पंपावर कार्यरत कर्मचारी कडून आपण सांगितल्याप्रमाणे मशीन वर पैसे नमूद केल्या जातात, आणि तो कर्मचारी आपल्यासमोरच याचा बटन दाबतो. मात्र पेट्रोल पंप मशीन मध्ये असलेल्या बटनांमध्ये पूर्वीच सेटिंग केलेली असते. त्यामुळे किंमत नमूद केल्यावरही कमी पेट्रोल निघते. असे लोकांना वाटत असले तरी या मागील सत्य काय आहे ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.
असे काम करते पेट्रोल पंपावरील मशीन?
पेट्रोल पंपावर कार किंवा मोटर बाईक मध्ये इंजिन भरणारी मशीन ही फ्लो मीटर सिस्टीम Flow Meter System वर काम करीत असते.जसे आपल्या घरात पाणी मीटर काम करते ही सिस्टम तशीच आहे.
पण पेट्रोल पंपावर मशीन सोबत जुडलेले नोझल मध्ये एक विशेष सेन्सर असतो.हा मशीन मधून नमूद किमतीनुसार वाहनात पेट्रोल ओतत असते. पंप मशीन मध्ये दर दिवशी इंधन किमतीमध्ये होणारे बदल दर्शविले जाते, आणि यानुसारच पेट्रोल किंवा डिझेल वाहनात भरल्या जाते.
उल्लेखनीय म्हणजे जेव्हा आपण गाडीत पेट्रोल भरतो, तेव्हा आपण सांगितल्याप्रमाणे पेट्रोल पंप मधील मशीन किंमत टाकल्यानंतर ते दर्शविते,या किमतीनुसार पेट्रोल भरल्या जाते. 100 किंवा 200 रुपयांसारखे प्रे सेटिंग मध्ये ऑपरेटर बटन दाबतात,तेवढ्याच किमतीचे पेट्रोल भरले जाते,आणि तेवढेच ते मशीन मध्ये असलेला नोझल मधून पेट्रोल निघत असते.
मात्र यात नजरेतून दिसणारा पेट्रोल, डिझेल हा वेगाने समोर जाते त्यामुळे या संबंधात मशीन मध्ये आधीच सेटिंग झाल्याची शक्यता असते.
पेट्रोल भरण्यासाठी हे पर्याय ही कारगर?
1)पेट्रोल पंपावर गेल्यानंतर तुम्हाला तेथील कामगाराने मशीनमध्ये अमाऊंट आणि लिटरचे प्रे सेटिंग केल्यानंतर, पंपामधून योग्य प्रमाणात इंधन मिळत आहे किंवा नाही, याची माहिती घेण्यासाठी,प्रत्येक वेळी गाडीत पेट्रोल किंवा डिझेलने टंकी फुल न करता काही प्रमाणात इंधन घेऊन आपण तपासू करू शकतो. हा एक सोपा उपाय आहे. यामुळे वाहनात योग्य प्रमाणात पेट्रोल मिळाला आहे किंवा नाही हे कळेल.
2)यासाठी दुसरा पर्याय सुद्धा आहे.ते म्हणजे, 100,200 राऊंड फिगर रुपयात किती पेट्रोल येते हे पाहण्यासाठी मीटर मध्ये तेवढेच पेट्रोल दाखवले जात असेल तर आपण निश्चिंत राहू शकतो.
3)यासाठी तिसरा पर्याय म्हणजे आपल्या कार किंवा मोटर बाईक फ्युल मीटर हे नेहमीच परफेक्ट आणि अपडेट ठेवा, यामुळे पेट्रोल पंपावर नेहमी योग्य प्रमाणात पेट्रोल मिळत आहे किंवा नाही याची सहज कल्पना येईल.