Bike Engine Oil Change : बाईक इंजिन मध्ये ऑइल चेंज करण्याची योग्य वेळ कोणती ? इंजिनची लाईफ जास्त करण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा ! आजच्या आधुनिक जगात मोबाईल आणि वाहन असणे फार गरजेचे झाले आहे. दैनंदिन कामांसाठी कारपेक्षा बाईक चालविण्याला सर्व लोक प्राधान्य देतात. मात्र नेहमी बाईकचा उपयोग करणाऱ्यांसाठी बाईकचा मेंटेनन्स नियमित करीत राहणे महत्त्वाचे असते.यात बाईक मध्ये केव्हा आईलची गरज आहे.यावर लक्ष देणे महत्त्वाचे आहे,कारण बाईक इंजिन सुरळीतपणे काम करावा यासाठी त्यात वेळोवेळी ऑईलची मात्रा पर्याप्त राहणे गरजेचे असते.
Oil level वर लक्ष न दिल्यास इंजिन जॅम किंवा लॉक” होण्याचा खतरा.
अनेक लोक विविध कंपनीचे बाईक आणि स्कूटर मोपेड वापरताना सहसा इंजिनला ऑईलची गरज आहे किंवा नाही यावर लक्ष देत नाही, त्यामुळे आईलची मात्रा कमी किंवा संपल्याने एक तर बाईक इंजनचे पार्ट घासले जाऊन त्यांचा नुकसान होतो,तर दुसरीकडे इंजिन मध्ये आवाज सुरू होते,आणि इंजिन जाम झाल्याने बाईकच्या एव्हरेज आणि स्पीडवर फरक पडतो. ऑइल कमी पडत असल्याने दुसरीकडे इंजिनचे स्मुदनेस Smootheness संपून जाते.
जर आपण बाईकच्या इंजिन मध्ये ऑइल पूर्ण संपला आणि त्यावर लक्ष दिले नाही तर संपूर्ण “इंजिन जॅम किंवा लॉक” होण्याचा खतरा असतो. पुढे इंजिन दुरुस्त करण्यासाठी मग खूप खर्च करावा लागतो.त्यामुळे वेळोवेळी आपल्या बाईकच्या इंजिनला आईलची गरज पूर्ण केली तर पुढील खर्च आपण वाचवू शकतो,ते कसे तर आपण या माध्यमातून या बाबींवर नजर टाकूया.
आपल्या आवडत्या बाईक किंवा मोपेड वाहनाला सुरळीत चालविण्यासाठी आणि चांगल्या प्रकारे मेन्टेन करण्यासाठी इंजिनला वेळोवेळी ऑईलचा डोज देणे गरजेचे असते.ऑइल ही इंजिनची प्रमुख गरज असते. यामुळे इंजिनचे आयुष्य ही वाढते आणि बाईक किंवा स्कूटर चांगला एव्हरेज देते.
पर्याप्त ऑइल असला की,इंजिनचे पार्टसुद्धा चांगली लाईफ देतात.त्यामुळे या माध्यमातून आपण पाहूया,बाईक किंवा स्कूटर चालविताना किती वेळेनंतर इंजिनला ऑइल देण्याची किंवा चेंज करण्याची गरज असते?
बाईक मध्ये इंजिनला ऑइल पुरविण्यासाठी बाजारात वेगवेगळे ऑइल कंपनीचे पॅक पॅक विकल्या जातात. भारतात अनेक ब्रॅण्डेड बाईक ऑइल उत्पादन करणाऱ्या कंपन्या आहेत. त्यापैकी सर्वसाधारणपणे लोक लोक चालचलाऊ ऑइल पेक्षा ब्रँडेड कंपन्यांचे ऑइल पॅक आपल्या इंजिन साठी वापरात आणतात.
सेन्सर देतात ऑइल indications.
या आधुनिक युगामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आधुनिक फीचर्स असलेले बाईक्स आणि मोपेड स्कूटर चालविल्या जातात. यात इंजिनला केव्हा इंधन ची केव्हा ऑइल ची आणि केव्हा मेंटेनन्स ची गरज आहे याचे सेन्सर सुद्धा आता लावून येतात. त्यामुळे अशा बाईक्स चालविणाऱ्यांना वेळीच इंजन ला ऑईलची गरज आहे किंवा नाही हे मीटर मध्ये यासाठी इंग्लिश इंडिकेशन येताच कळते. मात्र ज्यात सेन्सर्स लागलेले नाही, त्यांना इंजिन मध्ये ऑइल ची गरज आहे किंवा नाही हे वेळोवेळी मॅन्युअली गरजेचे असते. त्यामुळे आपल्या इंजिन मेकॅनिक ला विचारून बाईकला केव्हा ऑइल ची गरज असते हे लक्षात ठेवणे जरुरी राहते.
यावेळी करा इंजिन Bike Engine Oil Change.
बाईक चालवताना जेव्हा इंजिन जास्त घरघर आवाज करते किंवा त्याच्या स्पीड वर आपोआप परिणाम होते तेव्हा इंजिनला ऑईलची जास्त गरज असते इंजिन जास्त आवाज करतात त्याची प्रमुख कारण म्हणजे इंजिन मध्ये तेल बदलण्याची वेळ आली आहे असे समजावे. एक वेळा इंजिन ऑइल टाकल्यानंतर बराच काळतो बदलला जात नाही तेव्हा इंजिनमध्ये आवाज येणे सुरू होते. अनेक वेळा दीर्घ काळापासून इंजिन मध्ये ऑइल चेंज किंवा ऑइल टाकल्यास लाईकचे सायलेन्सर मधून काळा धूर निघतो तेव्हा ऑइल बदलण्याची किंवा टाकण्याची गरज असते.
बोटाने घासून तपासा इंजिनमध्ये ऑइल खराब आहे किंवा नाही?.
नवीन बाईक घेतल्यानंतर त्याचा इंजन हा स्वच्छ असतो.त्यात ब्राऊन (तपकिरी) किंवा विविध रंगात येणारा ऑइल इंजनमध्ये टाकल्यानंतर बाईक सुरळीत चालते.बाईक जितकी चालते तसतसा इंजन ऑइल लेव्हल कमी होती आणि कधी संपून जातो. ऑईलमुळे त्यातील पार्ट योग्य आणि मुलायमपणे Soft Runing चालतात.
- इंजिन जास्त ऑइल खात असल्यास किंवा पार्ट खूप घासत असल्याने इंजिन वर काळे डाग आणि जळालेल्या ऑईलचे डाग पडतात, तेव्हा इंजिन मध्ये ऑइल बदलण्याची गरज असते,किंवा इतर तांत्रिक खराबी असू शकते.मात्र जेव्हा बाईक इंजिनला आईलची गरज आहे किंवा नाही हे जर आपणास तपासावे लागले तर,यासाठी इंजिन मधील एक दोन थेंब ऑइल आपल्या बोटावर घेवून दुसऱ्या बोटाने ते घासून आपण इंजिन मधील ऑइल खराब झाला किंवा नाही हे तपासू शकतो.
- इंजिनमध्ये ब्लॉक पिस्टनच्या मागे मुख्य इंजन असतो त्यात थेट ऑइल ओतला जाते,यासाठी तेथे विशेष छिद्र आणि त्यात इंजिनच्या आत ऑईलची पातळी चेक करण्यासाठी लांब अशी दांडी असते,तिच्या आधारावर इंजिन मध्ये किती ऑइल आहे, तू खराब झाला किंवा नाही, हे निरीक्षण करण्यासाठी ती असते. त्याला काढून पाहिले तर इंजिन मध्ये आईची मात्र आपणास कळते.
- इंजिन मध्ये ऑइल संपल्यास घरघर आवाज येण्यासोबतच इंजिन ची स्पीड आणि एवरेजवर मोठा फरक पडतो. नवीन ऑइल टाकण्यापेक्षा जुना ऑइल वापरल्यास बाईक मधून काळा आणि जास्त प्रमाणात धूर निघतो.
- जर खूप काळ ऑइल चेंज केला नाही किंवा टाकला नाही तर इंजिन मेंटेनन्स खर्च वाढतो. इंजिनचा जाम होत असतानाही आपण ऑइल टाकला नाही तर आधी प्लग काळे होऊन,बाईक बंद होणे,प्लग शार्ट होतो,आणि नंतर ब्लॉक पिस्टन, कार्बोरिटर खराब आणि इंजिन मध्ये इतर पार्ट जॅम किंवा इंजिन लॉक होण्याची वेळ येवू शकते.त्यामुळे वेळीच इंजिन Oil बदलणे आपल्या बाईक इंजिनसाठी महत्वाचे ठरते.