भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे तहसीलदार यांना निवेदन.
*प्रतिनिधी: डॉ .किरण चाकोते*
रिसोड : रिसोड येथे भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री विष्णुपंत भुतेकर यांनी रिसोड येथील तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर मॅडम यांना निवेदन दिले आहे रिसोड तालुक्यात येत्या दोन दिवसांमध्ये अतिवृष्टी झाली असून काही ठिकाणी गारपीट चा फटका बसला आहे.
यामुळे उभ्या तुरीचे अतोनात नुकसान झाले आहे तसे पाहता यावर्षी शेतकऱ्यांचे अतिशय हाल झाले आहेत सोयाबीन पीक यावर्षी पाणी अभावी कमी उतार आला आहे आणि त्यात आता तुरीचे नुकसान यामुळे शेतकरी अत्यंत संकटात पडला आहे.तसेच निवेदनातून तुर, कापूस ,फळबाग, भाजीपाला यांना सुद्धा अतिवृष्टीमुळे फटका बसला आहे .
रिसोड तहसील येथे तहसीलदार मॅडम सोबत तालुका कृषी अधिकारी उलामाले सुद्धा उपस्थित होते यावेळी लगेच पंचनामे करून नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देऊ असे आश्वासन देण्यात आले यावेळी भूमिपुत्र शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर, युवक राज्य उपाध्यक्ष केशव गरकळ, जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र चोपडे, शहराध्यक्ष विकास झुंगरे, रवी जाधव, आदी कार्यकर्ते उपस्थित होते