Bharat Jodo Nyay Yatra: भारत जोडो न्याय यात्रे समेत Rahul Gandhi पोहचले महाराष्ट्रात.

Bharat Jodo Nyay Yatra: भारत जोडो न्याय यात्रे समेत Rahul Gandhi पोहचले महाराष्ट्रात.

Bharat Jodo Nyay Yatra: काँग्रेसचे नेते Rahul Gandhi यांच्या भारत जोडून यात्रेच्या महाराष्ट्रातील टप्प्याचे सुरुवात नंदुरबार मधून झालेली आहे. काल सकाळपासून राज्यातील दिग्गज नेते नंदुरबार मध्ये उपस्थित होते. यात्रेची सुरुवात 12 मार्च 2024 पासून सुरुवात झाली असली तरी यात्रेच्या तयारीसाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, महाराष्ट्र प्रभारी चैनीथला, विश्वजीत कदम पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह दिग्गज नेत्यांनी सकाळपासूनच नंदुरबार मध्ये हजेरी लावली होती.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

राहुल गांधी यांच्या आगमनाची जय्यत तयारी :

नंदुरबार हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता परंतु मागील दहा वर्षात कोणीही नंदुरबारला भेट दिली नव्हती, मात्र राहुल गांधी यांच्या आगमनाने काँग्रेस पक्षात नवचैतन्य निर्माण झालेले दिसले आहे. नंदुरबार येथील होणाऱ्या सभेच्या ठिकाणी जवळपास एक एक रात पेंडॉल उभारण्यात आले होते. आदिवासी बांधव राहुल गांधीचे विचार ऐकण्यासाठी येतील असा अंदाज आयोजकांनी केला होता.

असा असणार भारत जोडो न्याय यात्रेचा महाराष्ट्र दौरा :

भारत जोडो न्याय यात्रेची प्रथम सांगता 15 जानेवारीला मणिपूर येथून करण्यात आली होती. सध्या भारत जोडो न्याय यात्रा गुजरात येथील सोनगड मधून रवाना होऊन नंदुरबार मध्ये 12 मार्च रोजी मध्ये दाखल झाली. 13 मार्च ला धुळे – मालेगाव येथे राहुल गांधी संबोधित करणार. 15 मार्च पालघर-ठाण्यात यात्रा येऊन पोहचेल. 16 मार्च ला मुंबई मध्ये दाखल होऊन 17 मार्च ला मुंबई येथील शिवाजी पार्क वर यात्रेचा समारोप करण्यात येईल.

नंदुरबार सभे दरम्यान राहुल गांधींचे जनतेला संबोधन:

“आमचे सरकार आले तर आदिवासींच्या जमिनी ताब्यात देवतांना हक्क मिळवून देऊ.” अशी घोषणा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे. मोदी सरकार उद्योगपतींच्या फायद्यांसाठी जंगले संपवायला घेतली आहेत, असा आरोप राहुल गांधींनी केला आहे. “देशातील मोठ्या उद्योगपतींचे कोटींचे कर्ज माफ केले, परंतु सरकारने कधीही सर्वसामान्याचे कर्ज माफ केले आहेत का” अशी जोरदार टीका सरकारवर राहुल गांधी यांनी केली.

राहुल गांधीची न्याय यात्रा आज धुळ्यात :

काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची उपस्थिती धुळ्यामध्ये आज दुपारी 12 ते 1:00 च्या वेळेमध्ये होणार आणि महिला न्याय हक्क परिषद पार पाडण्यात येणार आहे. ही परिषद नागपूर सुरत बायपास मार्गावरील मैदानावर होणार असून राहुल गांधी यांची भारत न्याय जोडो यात्रा संध्याकाळी दोंडाईचात येथे दाखल होईल आणि इथूनच रोडशो देखील होणार आहे.

अशा पद्धतीने असणार कार्यक्रमाचे नियोजन :

सकाळी 11 वाजता दोंडाईचात वरून ते एसएसबीपीएस महाविद्यालयात पोहोचल्यानंतर राहुल गांधी यांचा ताफा महात्मा गांधी पुतळ्याजवळ पोहोचेल. आणि महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार ते अर्पण करतील आणि त्या ठिकाणी कॉर्नर सभेचे आयोजन देखील होणार. त्या ठिकाणी राहुल गांधी यांचे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस कडून स्वागत देखील केले जाणार आहे.

धुळ्यात पत्रकार परिषद घेऊन पदयात्रेची सुरुवात होणार आहे. राहुल गांधी यांचा मागील दहा वर्षानंतर चा हा दुसऱ्यांदा रोड शो धुळे शहरात होणार आहे. धुळ्यातील मनोहर टॉकीज जवळ शिवाजी महाराजांच्या स्मारकाला अभिवादन करून तिथे देखील कॉर्नर सभा राहुल गांधी घेतील.

भारत जोडो न्याय यात्रेची समारोपाची तयारी :

भारत जोडो यात्रा समारोपाच्या पहिल्या दिवशी राहुल गांधी सभा घेणार आहेत. या सभेला शरद पवार सुद्धा उपस्थित राहतील अशी आशंका आहे, आणि शिवाजी पार्कवरील सभेला इंडिया आघाडीवरील सगळ्या घटक पक्षांचे प्रमुख उपस्थित राहण्याची शक्यता आहे. दरम्यान आज सकाळी 10:30 वाजता शिवाजी पार्क मैदानाची पाहणी करण्यासाठी इंडिया आघाडीचे नेते या ठिकाणी जाणार असल्याचे सुद्धा माहिती आहे.

तर येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधीं महाराष्ट्रामध्ये आले त्यामुळे ही यात्रा अतिशय महत्त्वपूर्ण मानली जात आहे, तरी यात्रेसाठी राज्यातील सगळेच काँग्रेस कार्यकर्ते एकवटले असून यात्रा यशस्वी करण्यासाठी जोरदार प्रयत्न देखील सुरू आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

11 + 3 =