Baramati LokSabha Constituency: बारामती कुणाची? अस्सल राजकारण की कौटुंबिक कलह?

Baramati LokSabha Constituency: बारामती कुणाची? अस्सल राजकारण की कौटुंबिक कलह?

Baramati LokSabha Constituency: केंद्रीय निवडणूक आयोगात राष्ट्रवादीच्या चिन्ह बाबत आणि पक्षाबाबत गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या युद्धात राष्ट्रवादीची टिकटिक अजित पवारांकडे गेली आहे. म्हणजेच राष्ट्रवादीचा पक्ष आणि जिल्हा अजित पवार गटाला मिळालेला आहे. लोकसभेची निवडणूक तोंडावर असताना एकीकडे अजित पवार गट तर दुसरीकडे शरद पवार आणि कन्या सुप्रिया सुळे अशी दोन गटे तयार झाली आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघासाठी अजित पवार गटाने खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरुद्ध अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांची उमेदवारी असण्याची शक्यता दर्शविली आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

तर आता बारामती शरद पवारांच्या मुलीची की सुनेची?

बारामती लोकसभेच्या मतदार संघासाठी पहिल्यांदाच पवार कुटुंबातील दोन व्यक्ती आमने-सामने झळकणार आहेत म्हणजेच भावजय विरुद्ध ननंद! 2024 च्या निवडणुकीत महिला शक्ती एकमेकांविरुद्ध लढताना आपल्याला दिसणार आहे. संसद रत्न पुरस्कार विजेत्या सुप्रिया सुळे यांना राजकारणाचा दांडगा अनुभव आहे. त्या पाच वेळा लोकसभा आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. तर सुनेत्रा पवार या पहिल्यांदाच राजकारणात आपले पाय रोवण्याचा परिपूर्ण प्रयत्न करणार आहेत. त्यांच्या पाठीशी अजित पवार तसेच भारतीय जनता पार्टीचा मदतीचा हात राहणार असल्याकारणाने कोणाला कमी जास्त लेखणे अशक्यच आहे. या निवडणुकीत कोणत्या पवार परिवाराचा प्रभाव जास्त राहील, हे बघण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता लागली आहे.

सुप्रिया v/s सुनेत्रा,भारी पगडा कुणाचा?

सुप्रिया सुळे या बारामतीच्या विद्यमान खासदार आहेत. 2006 पासून त्यांनी राजकारणात प्रवेश केला व महाराष्ट्रातून पहिल्यांदाच राज्यसभेवर निवडून आल्या. 2009 मध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून 3.36 लाख मतांनी विजय मिळवला. 2012 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त मुंबईत “राष्ट्रवादी युवती काँग्रेस” सुरू केली. 2014 आणि 2019 मध्ये त्यांच्या कामगिरीने त्या पुन्हा महाराष्ट्रातील बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्या. समाजसेवेतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल सुप्रिया सुळे यांना मुंबई वुमन ऑफ द डिकेड अचिव्हर्स सन्मान देऊन गौरवण्यात आले आहे.

अजित पवार यांनी यावर्षीच्या लोकसभा निवडणुकीत भाग न घेता त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे नाव कोड्यात घेतले आहे.

सुनेत्रा पवार यांना सुद्धा राजकीय घराण्याचा वारसा आहे. उस्मानाबादचे राणा जगजीत सिंह पद्मसिंह पाटील हे भाजपचे आमदार आहे. भलेही सुनेत्रा पवार राजकारणापासून दूर राहिल्या परंतु समाजसेवेमध्ये त्या नेहमी सक्रियपणे सहभागी झाल्या आहेत. एनवोर्मेंटल फोरम ऑफ इंडियाच्या त्या संस्थापक आहेत. साहजिकच अजित पवार त्यांच्या पत्नींना सामाजिक कार्याच्या जोरावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून बारामतीत लढवतील.

पक्ष आणि चिन्ह मिळवल्यानंतर युवा मिशन 2024 महामेळावा त्यांनी आयोजित केला होता. या मेळाव्यामुळे युवाशक्ती सुनेत्रा पवारांच्या पगड्यात पडणार की राजकारणाचा गाढ अनुभव असणाऱ्या सुप्रिया सुळे यांचा परडा भारी होणार. हे येत्या निवडणुकीत आपल्या सर्वांनाच बघायला मिळणार आहे. यावरून राजकारण कुटुंबाचे चालणार की जनहिताचे. असा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडलेला दिसतो आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

nine − seven =