Banned Chinese App : जगात ओपन एआय क्षेत्रात आता चायनीज Deepseek ची एन्ट्री झाल्यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रात नवीन क्रांती आलेली आहे.जेवढे इतर चायनीज आइटम स्वस्त असता,तेवढाच हा चायनीज एआय सिस्टम उपयोगात आणता स्वस्त आहे.या सिस्टमला सुद्धा चिनमधील एका टेक्नॉलॉजी स्टार्टअप कंपनीने अमेरिकन सिस्टमच्या तुलनेने 400 पट कमी किमतीत बनविलेले आहे.
डीपसिक भारतात येताच हा Open AI Application वापरण्यासोबतच आता भारतात बंदी असलेले अनेक चायनीज एप्लीकेशन सुद्धा वापरले जात आहे.भारतात वर्ष 2020 मध्ये सरकारने देशाची सुरक्षा,शासकीय आणि नागरिकांचे व्यक्तिगत डाटा सुरक्षा,भारत चीनमध्ये भौगोलिक भागांवर सामरीक रणनीती आणि गलवान रॅलीमध्ये चीन आणि भारताच्या फौजेत संघर्ष या सर्व बाबींची पार्श्वभूमीवर 267 चायनीज एप्लीकेशन वर तात्काळ बंदी घातली होती.
मात्र आता यातील अनेक चायनीज ॲप्लिकेशन्स आता पुन्हा भारतात एप्लीकेशन पुरवठा करणाऱ्या गुगल प्ले स्टोअर आणि ॲपल ॲप स्टोअर वर डाऊनलोडसाठी उपलब्ध आहे.विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार यापैकी अनेक एप्लीकेशन जसेच्या तसे आणि काही एप्लीकेशन नवीन नावाने आणि रिब्रेडिंग (Rebranding) करून उपलब्ध करण्यात आलेले आहेत.
यात काही अप्लिकेशन रीब्रेंड केल्याने त्यांचे मालकी हक्क बदलण्यात आलेले आहे. महत्त्वाचे म्हणजे भारतात कायदेशीररित्या हे ॲप्लिकेशन चालविता येणे सुलभ व्हावे,यासाठी या एप्लीकेशन कंपनीनी भारतीय कंपन्यांसोबत एग्रीमेंट केली आहे.या चायनीज एप्लीकेशन वर सुरक्षिततेच्या दृष्टीने तांत्रिक बंदी असतानाही, नवीन नाव आणि रिब्रँडिंग करून चालविल्या जात असल्याची शक्यता आहे.
देशाच्या सुरक्षिततेला धोका म्हणूनच या 267 चायनीज एप्लीकेशन वर भारताने 2020 दरम्यान बंदी घातली होती.यानंतर काही प्रमाणात हे बंदी उठविली होती,मात्र सध्याही भारतात एकूण 36 असे चायनीज एप्लीकेशन्स आहे,ज्यांच्यावर भारतात बंदी कायम आहे,मात्र यापैकी अनेक चिनी ॲप्स भारतात पुन्हा उपयोगात येत आहे.
सरकार AI एप्लीकेशन शासकीय कामात वापरताना अलर्ट मोडवर,
पण इतर बंदी असलेले Apps चाही वापर वाढला…
भारतात शासकीय कर्मचारी एआय सिस्टम (Open AI) ने शासकीय काम सुरू करीत असतानाच आता हा चायनीज ओपन आर्टिफिशियल इंटेलिजन्स एप्लीकेशन आला आहे. या सर्व बाबींमुळे केंद्र सरकारने आरटीफिशियल इंटेलिजन्स चा शासकीय कामात वाढणारा वापर आणि याचा धोका लक्षात घेता अलर्ट भूमिका घेतली आहे.
शासकीय कामात एआई चा वापर होत असल्याने गोपनीय सरकारी माहिती आणि सरकारी डाटा चोरीचा संभाव्य धोका पाहता सरकारला ही भूमिका घ्यावी लागली. तर दुसरीकडे भारतात 2020 पासून एकूण 267 चायनीज एप्लीकेशन वर बंदी असतानाही, आता यातील अनेक चायनीज एप्लीकेशन भारतात पुन्हा बिंदास वापरणे सुरू असल्याची माहिती समोर आलेली आहे.
सध्या भारतात चायनीज स्त्रोत असलेले एप्लीकेशन मध्ये टनटन,ताओ बाओ, मँगो टीव्ही,जेंडर याचा इतर एप्लीकेशन चा समावेश आहे जे सध्या बिंदास वापरले जात आहे.
झेंडर (Xender)
भारतात हा एप्लीकेशन विविध फाईल शेअरिंग एप्लीकेशन साठी वापरला जात आहे.जेंडर हा पुन्हा एप्पल वर उपलब्ध आहे. मात्र याला गुगल प्ले स्टोअर वर उपलब्ध करण्यात आलेला नाही.
मँगो टीव्ही (Mango TV)
मुख्यतः चिनी स्टीमिंग प्लॅटफॉर्म असलेला हा मँगो टीव्ही App आहे. याचे दोन अप्लिकेशन असून हे दोन्ही गुगल play Store आणि एप्पल प्ले स्टोअर वर उपलब्ध आहे. विशेष म्हणजे या दोन्ही एप्लीकेशन कोणताही ब्रँडिंग केल्या गेले नाही,किंवा त्यांची मालकीही बदलण्यात आली नाही,तरीही हे दोन्ही एप्लीकेशन्स भारतात बंदी असूनही प्ले स्टोअर वर उपलब्ध आहे.
योको (Youku)
योको हे चीनमध्ये व्हिडिओ स्ट्रीमिंग सेवा देते.(Streaming Service)भारतात हा ॲप आता प्ले स्टोअरवर उपलब्ध करण्यात आला आहे.त्यामुळे कोणीही या युको एप्लीकेशनला सहजरीत्या इन्स्टॉल करू शकते.
ताओ बाओ Taobao
ताओ बाओ हा चीनमधील सर्वात मोठी कंपनी असलेली अलीबाबा कंपनीचा शॉपिंग एप्लीकेशन आहे.य ला आता भारतात कोणताही रिब्रेंडिंग न करता पुन्हा सुरू करण्यात आलेला आहे.यावर भारतात बंदी असतानाही हा शॉपिंग ॲप हा गुगल किंवा गुगल प्ले स्टोअर किंवा एप्पल ॲप स्टोअरवर कुणीही इन्स्टॉल करू शकतो.
टन टन Tantan
हा चायना मध्ये एक डेटिंग एप्लीकेशन आहे. (Dating Apps.)आता हा टन टन एप्लीकेशन रीब्रँड करून याला एशियन डेटिंग ॲप म्हणून प्ले स्टोअरवर उपलब्ध करण्यात आलेला आहे.
- उल्लेखनीय म्हणजे चायनीज मूळ असलेले एकूण 36 एप्लीकेशन भारतात पुन्हा सुरू झाले आहे.
- मात्र भारतात सर्वात जास्त वापरला जाणारा आणि चर्चेत असलेल्या tiktok भारतात बंदी घातल्यानंतर त्याची पुन्हा एन्ट्री होऊ शकली नाही.
- मात्र गुगल प्ले स्टोअर आणि एप्पल वर टिक टॉक सारखेच अनेक ॲप्लिकेशन्स सध्या उपलब्ध आहेत.
- हे ॲप्लिकेशन रिब्रँड करून किंवा भारतातील कंपन्यांसोबत करार करून चायना येथील एप्लीकेशन कंपनीनी टिक टॉक सारखेच वापर व्हावे म्हणून सुरु तर केले नाही ना?ही बाब शंका घेण्यासारखी आहे.
- त्यामुळे आता भारत सरकार याकडे काय कारवाई करते हे पाहणे महत्त्वाचे असेल.
Banned Chinese App : असे आले पुन्हा भारतात हे चायनीज एप्लीकेशन.
भारतात सध्या 36 चायनीज ॲप्स वर बंदी कायम आहे. मात्र अशीही शक्यता आहे की,यापैकी अनेक ॲप्लिकेशन्स कंपन्यांनी भारतात आपली एप्लीकेशन प्रोडक्शन Strategy बदलून जुन्या एप्लीकेशनना नवीन नाव देऊन,आणि रिब्रँड करून भारतातील निर्बंध चुकवून याचे मालकी हक्क बदलले असेल.
या दरम्यान अशीच माहिती समोर आलेली आहे की,यामध्ये असलेला एक फॅशन शॉपिंग एप्लीकेशन चीनमधील एका कंपनीने भारतातील रिलायन्स कंपनीसोबत भागीदारी करून त्याला पुन्हा एप्लीकेशन स्टोअरवर लॉन्च केले आहे.
यामुळे या एप्लीकेशनचा च्या डाटा स्टोरेज हा भारतातच राहील आणि तो सुरक्षित राहील,असा दावा केला जात आहे.वर्ष 2020 मध्ये भारतात बंदी असलेला पब्जी मोबाईल ॲप्लिकेशन (PUB G) हा पुन्हा दक्षिण कोरियाच्या क्राफ्टनन या ॲप्लिकेशन कंपनीच्या माध्यमातून बॅटल ग्राउंड मोबाईल इंडिया (Battalground India) या नावाने भारतात पुन्हा परतला. Pubg ॲप वर 2020 मध्ये बंदी आल्यानंतर हा नवा ॲप तसाच असल्याने या बॅटल ग्राउंड मोबाईल इंडिया एप्लीकेशनवरही भारत सरकारने 2022 मध्ये बंदी घातली, पण सध्या भारताच्या सेक्युरिटी गाईडलाईनचे या कंपनीने पालन केल्याने वर्ष 2023 मध्ये या एप्लीकेशनला परवानगी देण्यात आली आहे.
एप्लीकेशन कंपन्यांनी पळवाट शोधली?
भारत सरकारने चायना सह इतर विदेशी एप्लीकेशन मुळे डाटा सेक्युरिटी आणि इतर तांत्रिक बाबी पाहता अनेक एप्लीकेशन वर भारतात बंदी घातलेली आहे.बंदीसाठी सरकारने नियमही तयार केलेत.
त्यामुळे या कंपन्यांना भारतात आपल्या एप्लीकेशन सुरू ठेवणे कठीण झाले. मात्र या एप्लिकेशन कंपन्यांनी केंद्र सरकारने तयार केलेल्या नियमांनाही आता पळवाट शोधून काढलेली आहे. अनेक कंपन्या असे मार्ग शोधून आणल्या आणि अनेक कंपनी बंदी एप्लीकेशन पुन्हा इंडियन मार्केटमध्ये परतविण्यासाठी मार्ग शोधत आहेत.
या Apps चे मूळ कंपन्या आणि मूळ मालक कोण आहेत, ट्रॅक करून पुढील कारवाई करणे जरुरीचे
व्हिएतनाम,दक्षिण कोरिया,जपान,सिंगापूर, बांगलादेश आणि इतर देशातील अनेक ॲप्लिकेशन कंपन्यांकडे स्वतःचे ॲप ॲप्स ची मालकी आहेत.त्यामुळे आता भारतात बंदी असलेले अनेक अप्लिकेशन्स पुन्हा सुरू झाल्याने या Apps चे मूळ कंपन्या आणि मूळ मालक कोण आहेत आणि त्यांना सरकारने ट्रॅक करून पुढील कारवाई करणे जरुरीचे आहे.उल्लेखनीय म्हणजे अनेक एप्लीकेशन कंपन्या भारतातील स्थानिक नियमांचे पालन करण्यासाठी आणि भारतात आपले ॲप्लिकेशन्स सुरू करण्यासाठी भारतीय कंपन्यांसोबत नवे करार आणि पार्टनरशिप मधून असे अप्लिकेशन चालवीत आहे.