Bank Account : आता बँक खात्यात किती रोकड जमा केली तर होईल Income Tax ची कारवाई ?
Bank Account : आता बँक खात्यात किती रोकड जमा केली तर होईल Income Tax ची कारवाई ? किती टॅक्स अन्,सरचार्ज भरावा लागेल जाणून घ्या ?
आता बँक खात्यात तुम्ही रकम जमा करताच ती इन्कम टॅक्स विभागाने ठरविलेली मर्यादा आणि नियमापलीकडे असल्यास तुम्हाला इन्कम टॅक्स विभागाच्या नियमानुसार सरचार्ज आणि सेस द्यावा लागणार आहे.इतकी रकम आणि उत्पन्नाचे स्त्रोताची माहिती इन्कम टॅक्स विभागाला द्यावी लागेल.तेव्हा बँक खात्यात नेमकी किती रकमेवर हा आर्थिक बोजा पडू शकतो आणि इन्कम टॅक्सच्या निशाण्यावर येण्यापूर्वी प्रत्येक बँक ग्राहकाला माहिती असणे गरजेचे आहे.
आयकर विभागाच्या नियमानुसार करंट बँक अकाऊंट मध्ये10 लाखांपेक्षा जास्त रक्कम जमा करताना उत्पन्नाचे स्त्रोत दिले नाही तर अश्या खातेदारास त्याच्याकडून खात्यात जमा रक्कमेवर इन्कम टॅक्स विभागाला 60% कर,यावर 25 सरचार्ज तसेच 4 टक्के सेस लागतो.याचा अर्थ बँक ग्राहक आपल्या बचत खात्यातून 10 लाखांपेक्षा जास्त रोकड व्यवहार एका आर्थिक वर्षात करु शकत नाही.हा व्यवहार फक्त करंट अकाउंट मध्ये होतो.
देशात सर्व राष्ट्रीय आणि खासगी बँकेत मोठ्या प्रमाणात दैनंदिन आर्थिक व्यवहार होतात.सर्वसामान्य नागरिक,नोकरदार, व्यापारी, उद्योजक यांचे बँकेत दररोज व्यवहार होतात.अनेक मोठ्या रकमा बँकेत भरल्या जात असतात.मात्र लाखो रुपयांच्या व्यवहारासाठी बँक अश्या लोकांस करंट बँक खाते उघडण्याचा सल्ला देत असते. तर सर्वसामान्य व्यक्तींना व्यवहारासाठी बँक खाते सेव्हींग प्रकारचे असतात.अश्या सेविंग बँक खात्यात रोकड भरण्याचे काही नियम आहेत. यात कुणीही 10 लाख किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम भरत असेल तर असा खातेदार इन्कम टॅक्सच्या रडार वर असते.त्यामुळे आयकर विभागाच्या या नियमांची माहिती बँक खातेदाराना असणे गरजेचे असते.
काय आहेत नियम,पाहूया.
विशेष म्हणजे आरबीआय. च्या नियमानुसार कुणाच्याही सेविंग अर्थात बचत खात्यात नेमकी किती रक्कम असायला हवी यावर मर्यादा नाही,पण कुणाच्याही सेविंग खात्यात 10 लाखापेक्षा जास्त रक्कम येताच आयकर विभाग अलर्ट होतो.बँकेकडून ही बँक खात्याची माहिती इन्कम टॅक्स विभाग जर मागत असेल तर ती देण्याचा अधिकार असतो.मात्र यात अशी सुद्धा मुभा आहे की ,बचत खात्यात चेक किंवा ऑनलाईनच्या माध्यमातून 1 रुपयापासून लाख, कोटीपर्यंतचे व्यवहार करता येणार आहे.पण यावर सरचार्ज अन किती टक्का कर द्यावा लागतो हे पाहणे सुद्धा महत्वाचे आहे.
रिटर्न भरणाऱ्यांसाठी वार्षिक 10 लाख भरणाऱ्यांवर मर्यादा.
जर कुणी खात्यात 50,000 रुपयांपेक्षा जास्त रोकड रक्कम जमा करत असेल तर त्याला आपला पॅन क्रमांक द्यावा लागतो.बँकेत एका दिवसात कुणी एक लाखाची रोकड जमा करत असेल तर हा नियम असतो. पण कुणी जर आपल्या बँक खात्यात नियमित पैसे जमा करत नसेल तर ही मर्यादा 2.50 लाख रुपये इतकी असते.अर्थातच कुणालाही एका आर्थिक वर्षांत 10 लाख रुपये जमा करता येते.विशेष म्हणजे आयकर रिर्टन भरणाऱ्यांना सर्व खातेदारांसाठी ही मर्यादा असते.
बँक देईल आयकर विभागाला माहिती.
नव्या नियमानुसार जर कुणी 10 लाख किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम एका आर्थिक वर्षात भरत असेल तर बँकेला याची माहिती आयकर विभागाला द्यावी लागणार आहे. नंतर अश्या खातेदारास आयकर विभागाला या रक्कमेच्या उत्पन्नाचे स्त्रोत दाखवावे लागेल.असा खातेदार जर तो उत्पन्नाच्या स्त्रोत सांगू शकत नसेल तर तो आयकर विभागाच्या रडारवर येवून त्याच्याविरोधात चौकशी होईल. दोषी आढळल्यावर आयकर विभाग त्याला दंड ठोकणार आहे. अश्या खातेदाराने10 लाखांपेक्षा जास्त रक्कम जमा केली आणि उत्पन्नाचे स्त्रोत दिले नाही तर त्याच्याकडून खात्यात जमा रक्कमेवर आयकर विभाग 60 टक्के कर, 25 टक्के सरचार्ज आणि 4 टक्के सेस घेणार आहे.मात्र कुणीही आपल्या बचत खात्यातून 10 लाखांपेक्षा जास्त रोकड व्यवहार एका आर्थिक वर्षात करु शकत नसेल. किंवा त्याच्याकडे असे उत्पनाने स्त्रोत असेल तर अश्याना घाबरण्याचे कोणतेच कारण नाही.