*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब*
समजा बांधवांनी प्रमाणत धम्म परिषदेचे आयोजन करून धम्म परीवर्तनाचे व आंबेडकर चळवळ जिवंत ठेवण्यासाठी काम समाज बांधवानी करावे असा धम्म संदेश देत धम्म ध्वजा दिनाचे महत्व गावंडे यांनी आपल्या प्रबोधनातून दिला.
बाभुळगाव तालुक्यातील समता परीसर कोपरा क्र २ डॉ बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय संस्था, यांच्या वतीने गेल्या १६ वर्षापासुन धम्म ध्वज दिनानिमत्त धम्म ध्वजाचे महत्त्व समाजातील बौध्द उपासक व उपसिका यांना माहीत असावे या उदत्त हेतूने डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशिय संस्था हि ७,८,९, तीन दिवसिय 16 व्या ऐतिहासिक धम्म परिषदेचे बाभूळगाव येथे आयोजन करण्यात आले होते. धम्म दिनी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. बाळासाहेब गावंडे हे बोलत होते.
धम्म ध्वजा दिना निमीत्त भव्य दिव्य धम्म ध्वज पू. भदंत राहुलबोधी थेरो यांच्या हस्ते मान वंदना देत फडकविण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.उमरे हे.होते.तर प्रमुख वक्ते प्रा. डॉ. सूनंदाताई वालादे. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. बाळासाहेब गावंडे, धर्मपाल माने जिल्हाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा यवतमाळ. हे उपस्थित होते. तर मंचकावर आनंद भगत, महादेवराव अढावे, कृष्णाजी रंगारी, दुर्वास गवई, गौतम लांडगे, पराग पिसे, सुधाकर गडलिंग उत्तमराव मनवर.
विनायक माहुरे, दिलीप शेंडे,होते पु. भदंत उपाली.पू भंते सरिपुत्त पू भंते सुबोध.पू भंते संघरक्षित भंते दिव्यानंद हे उपस्थित होते. तर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सखारामजी देवपारे,संचालन संजय तिरपुडे. आभार राजू पाटील यांनी केले.या कार्यक्रमाला तालुक्यातील बौध्द उपासक. उपसीका मोठ्या संख्येने उपस्थित होते.