*प्रतिनिधी:-जाकिर अहमद बाळापुर जिल्हा अकोला*
बाळापूर :- वाडेगाव येथे मंगळवार दि.26 मार्च रोजी सकाळी पंचशील नगरात एका 26 वर्षीय महिलेने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आल्याची घटना ताजी असतांनाचं वाडेगावात आणखी एक दुर्दैवी घटना समोर आली.या घटनेत वाडेगाव येथील भवानी माता मंदिर परिसरात बांधकाम सुरु असलेल्या एका ठिकाणी 14 वर्षीय अल्पवयीन मुलाचा इलेट्रिक शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दुपारी 03:30 वाजेच्या दरम्यान घडली.
या संदर्भात शेख कफील शेख कदीर वय 40 वर्ष रा. सोफी चौक वाडेगाव यांनी बाळापूर पोलीस स्टेशनला मंगळवार दि.26 मार्च रोजी रात्री 7 वाजता दिलेल्या फिर्यादीवरून त्यांना त्यांच्या काकाचा दुपारी 3:30 वाजेच्या दरम्यान फोन आला कि, तुझा मुलगा शेख अयान शेख कफील वय 14 वर्ष हा भवानी माता मंदिराजवळील माणिक विनायक राहुडकर यांच्या येथे बांधकामावर असतांना इलेट्रिक शॉक लागल्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र वाडेगाव येथे उपचारासाठी आणले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.
अशा फिर्यादी वरून बाळापूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद दप्तरी घेतली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. अयान हा वर्ग 8 वी वर्गात शिक्षण घेत होता. बाल कामगार प्रतिबंधक कायदा असतांना बाळापूर तालुक्यात अल्पवयीन मुल काम करतांना दिसतात. मात्र या अयानच्या मृत्यूला जबाबदार कोण?असा प्रश्न जनतेला पडला आहे. लहान मुलांचे शोषण बंद करून मुलांना शिक्षणाच्या मार्गांवर पाठवणे गरजेचे झाले आहे.
कदाचित या अल्पवयीन मुलाला कामावर पाठवले वा ठेवले नसते तर कदाचित अयानचे प्राण वाचले असते! *मात्र बाळापूर तालुक्यात या अयान सारखी अशी बरीच अल्पवयीन लहान मुलं आहेत. जी आज ही बालकामगार म्हणून काम करतात*त्या लहान मुलांचे शोषण होतं असून याकडे प्रशासनाचे सुद्धा दुर्लक्ष होतं आहे. त्यामुळे अशा घटना घडल्यानंतर समोर येतात. त्यामुळे बाल कामगारांना प्रशासनाने वेळीच रोखले तर लहान मुलांची पिळवणूक होणार नाही व त्यांचे संरक्षण देखील होईल हे निश्चित.