बहुजन वंचितच्या जिल्हाध्यक्षांची मजूर कार्यालयाला भेट.
*बाभूळगाव : ता. प्र.मोहम्मद अदिब*
येथील जनवादी बांधकाम कामगार मजदूर संघटनेच्या कार्यालयाला समता पर्वाचे संस्थापक अध्यक्ष आंबेडकर चळवळीत नेतृत्व असलेले वंचित बहुजन महासंघाचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष नीरज वाघमारे यांनी दि.9जानेवारी रोजी सदिच्छा भेट दिली. यावेळी विश्व विजेता पत्रकार संघटना महाराष्ट्र प्रदेशचे संस्थापक अध्यक्ष रत्नपाल डोफे, संघटनेच्या कोषाध्यक्षा सुजाता डोफे, सामाजिक कार्यकर्ते संघपाल डोफे, बेबी डोफे, कल्याणी डोफे, मोनाली डोफे यांनी पुष्पहार व धम्मध्वज, शाल, पुष्पगुच्छ देऊन वाघमारे यांचा सत्कार केला. यावेळी दिलीप वाघमारे, दीपक मनवर, राजानंद बनसोड, विनोद वासे, राहुल विहिरे, उमेश दातार, पद्माकर कावळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.