**बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब**
बाभुळगाव येथे.सकाळी गस्तीवर असलेल्या पोलिसांनी दोन संशयित आरोपीला ताब्यात घेऊन चोरी करून आणलेल्या 20 बकऱ्या एक दुचाकी असा दोन लाख रुपये किमतीचा माल जप्त केल्याची घटना दि. 22 फेब्रुवारी रोजी सकाळी 6वाजताच्या सुमार घडली.
बाभुळगाव येथील पोलीस सकाळी 6 वाजताच्या दरम्यान आठवडी बाजार येथे पायदळी गस्त घालत असताना उमेश आनंदराव गायकवाड वय 36 वर्ष प्रफुल अरूनराव चौधरी वय 27 वर्ष दोन्हीं रा.कातखेडा देवळी. जि. वर्धा.दोन इसम संशयित फिरत असताना मिळाले.
त्यांना विश्वासात घेऊन माहीत विचारली असता पोलीस स्टेशन सेलू जिल्हा वर्धा जिल्ह्यातील हिंगणी गावातून 20 बकरी चोरी करून आणल्याची कबुली दिली.
आज बाभूळगाव येथील बकरी बाजार असल्याने चोरून आणलेल्या बकऱ्या बाभूळगाव बकरी बाजारात विक्री करीता घेऊन आले होते. पोलिसांनी 20 बकऱ्या अंदाजे किंमत 1लाख 60हजार व दुचाकी गाडी Extreme 40 हजार रुपये असा एकूण 2 लाख रूपयाचा मुद्देमाल ताब्यात घेतला.
कारवाईत साय्यक पोलीस निरीक्षक सुरज तेलगोटे ( प्रभारी ठाणेदार) जमादार निसार खान पोलीस कॉन्स्टेबल अमोल खडसे जमादार संजय कोहाड यांचा समावेश आहे.बकऱ्या चोरी संदर्भात पोलीस स्टेशन सेलू जिल्हा वर्धा येथे गुन्हाची नोंद असून याबाबत सेलू पोलिसांना माहिती दिली . मुद्देमालं व आरोपी पुढील कारवाई करीता पो स्टे सेलू यांचे ताब्यात देण्यात आले.