कृषी विभाामार्फत खरीप नियोजन आढावा बैठक व गुंणनियंत्र प्रशिक्षण.
**बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब**
बाभुळगाव येथील पंचायत समितीच्या सभागृहात दि.9 मे रोजी कृषी विभाग प.स. वतीने खरीप हंगाम 2024, पूर्ण नियोजन आढावा बैठक व गुणनियत्रंण विषयी प्रशिक्षणाचे तसेच शेतकऱ्यांना मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा कृषी अधिकारी माळोदे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून तालुका कृषी अधिकारी सुरेश गावंडे, प.स.चे कृषी अधिकारी अंबरकर, तालुका कृषी निविष्ठा विक्रेता संघाचे अध्यक्ष राजू नवाडे,तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून कीटनाशक शास्त्रज्ञ कृ. वि.के यवतमाळचे प्रमोद मगर हे उपस्थित होते.
विविध कृषी कृष्निविष्ठा विक्री करतांना कायदे अंतर्गत बांबीचे पालन करण्याच्या सूचना व तसेच साथी पोर्टल वरून सर्टिफाईड बियाणे विक्री संदर्भात जिल्हा कृषी अधिकारी माळोदे यांनी माहिती दिली.कृषी व्यवसायकांनी कृषी निविष्ठा विक्री करताना सोबतच शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे फार महत्त्वाचे असून जसे शेतकऱ्यांनी 75 ते 100 मिली पाऊस झाल्याशिवाय सोयाबीन बियाण्याची पेरणी करू नये, तूर व सोयाबीन पेरणी करते वेळी बीज प्रक्रिया करणे फार महत्त्वाचे आहे.
त्यामुळे कीटकांचे व मर रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो.बिबीएम तंत्रज्ञानाचा वापर केल्यास कमी पाऊसामुळे पिकांना पडणारा पाण्याचा ताण सहन करण्यास मदत होते.तर कापूस लागवडीत शेतकऱ्यांनी कपाशीच्या झाडाची संख्या वाढविणे फार महत्त्वाचे आहे. त्यामुळे उत्पन्नात वाढ होते .अशी माहीत पंजाबराव कृषी विद्यापीठ यवतमाळचे कीटक शास्त्रज्ञ प्रमोद मगर यांनी दिली.या कार्यक्रमात चंदू हेडाऊ तसेच कृषी सहाय्यक तिडके व कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी व तालुक्यारील कृषी विक्रेता तसेच शेतकरी उपस्थित.