बाभुळगाव येथील जि प उच्च प्राथमिक मराठी व सेमी इंग्रजी शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन व सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा.

बाभुळगाव येथील जि प उच्च प्राथमिक मराठी व सेमी इंग्रजी शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन व सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा.

*बाभुळगाव, तालुका प्रतिनिधि मोहम्मद अदीब*

दर वर्षी साजरा होणारा सांस्कृतिक कार्यक्रमाचा हा सोहळा चिमुकल्यांसाठीच नव्हे तर प्रेक्षकांसाठी सुद्धा आनंदाची पर्वणी असतो. या वेळि विविध कला आविष्कारातून विद्यार्थ्यांकडून सांस्कृतिक, सामाजिक व मनोरंजनात्मक सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोनल निखील तातेड अध्यक्षा शा.व्य.स.या होत्या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून बाभुळगाव चे पोलीस निरीक्षक सुनिल हुड होते.

प्रमुख पाहुणे म्हणून दिलीप बदकी नायब तहसीलदार बाभुळगाव, शिवसेना शहर अध्यक्ष प्रवीण लांजेकर,नगर सेवक अनिकेत पोहेकर, नरेश सातपुते उपाध्यक्ष शा.व्य.स.,निखील तातेड, नगर सेवक अभयभाऊ तातेड,केंद्रप्रमुख शशिकांत खडसे, अक्षय राऊत,अंकुश सोयाम, सचिन इंगोले, सतीश शेळके,वर्षाताई माटोडे, स्वातीताई थोटे, मंजुश्रीताई नांदुरकर, तृप्तीताई गुंडारे, मीनाताई वरखडे, रेणुकाताई सोयाम,हे उपस्थित होते.

खाजगी शाळेपेक्षा सरस कार्यक्रम बाभुळगाव येथील जिल्हा परिषद शाळेत होतात याचा मला आनंद आहे व असे प्रतिपादन बाभुळगाव चे पोलीस निरीक्षक सुनिल हुड यांनी केले. या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी समयोचित असे आपले विचार मांडले. या कार्यक्रमाचे संचालन प्रशांत भुराणे यांनी केले तर प्रास्ताविक केंद्रप्रमुख शशीकांत खडसे यांनी केले.

आभार वैशाली बोरकुटे यानी व्यक्त केले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संतोष लिचडे, प्रगती चिंचे, ज्योती गाजलेकर, ममता बिन्नोड, शाम लोखंडे, सुरेश बोबडे, सुनीता जयसींगपुरे, स्मिता फुलकर, जयमाला तिखे, छोटी चीव्हाणे, श्रद्धा येवतीकर , मिनाक्षी इंगोले, रुबीना छव्वारे, विठ्ठल पिंगळे, संध्या जांभुरे अनिता मोहनकर आदिंनी परिश्रम घेतले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

seventeen − seventeen =