बाभूळगावात रंगला खेळ पैठणीचा बाहाड, भूरणे,साहू, चौवळे, बोरकर ठरले पैठणीचे मानकरी.

बाभूळगावात रंगला खेळ पैठणीचा बाहाड, भूरणे,साहू, चौवळे, बोरकर ठरले पैठणीचे मानकरी.

*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब*

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

भारतीय जनता पक्ष महिला आघाडी बाभूळगाव यांच्या वतीने  पंतप्रधान मोदी यांच्या संकल्पनेतून नमो चषक खेळ पैठणीचा सन्मान नारी शक्तीचा या खेळाचे आयोजन दि.24 जानेवारी रोजी स्थानिक नगर पंचायतच्या  प्रांगणात करण्यात आले होते. कुटुंबाच्या रोजच्या दैनंदिन कार्यात माता-भगिनींना स्वतःसाठी वेळच मिळत नाही.महिलांचे एकमेकांशी हीतगुंज व्हावे एकमेकांना भेटता यावे व नवीन कल्पना  विचाराची देवाण घेवाण व्हावी अशा प्रकारच्या कार्यक्रमांमधून त्यांना स्वतःसाठी वेळ देता.

याकरिता मकर संक्रांतीचे औचित्य  साधून म्हणून नमो चषक खेळाचे आयोजन भाजपा महिला आघाडीच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून. भाजपा महिला आघाडी जिल्हा महामंत्री ललिता उमेश वर्मा,भाजपा महिला तालुका अध्यक्ष नीलिमा अजमिरे नगरसेविका न.प.वृंदा पिसे, माजी सभापती न.पं. सीमाताई पोहोकार स्वाती मिलिंद नवाडे , नलिनी खडसे, प्रणिता पाचकवडे, रिता तातेड ,उपस्थित होत्या.

कार्यक्रमात शहरातील 150च्या वर महिलांनी सहभाग नोंदविला होता.या स्पर्धेत उखाणे स्पर्धेतून प्रथम रश्मी बहाड, दृतिय रंजना भुराणे , संगीत खुर्ची मधून प्रथम स्वप्ना भुराणे, दृतीय अर्चना साहू,तर ग्लास पिरॅमिड मध्ये प्रथम स्नेहल चौवळे,तर दृतीस प्रीती बोरकर ह्या महिला पैठणीचे मानकरी ठरले  तर उपस्थित महिलांना मकर संक्रांतीनिमित्त हळद कुंकू लावून वान देण्यात आले. या कार्यक्रमा यशस्वी करीता प्रणिता पाचकवडे , ललिता वर्मा तसेच आदी भाजप महिला आघाडी यांनी परिश्रम घेतले.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

three × two =