जिल्हाधिका-यांची शेतकरी उत्पादक कंपनीला भेट कंपनीच्या उपक्रमांची केली प्रशंसा.
*बाभुळगाव, ता प्र मोहम्मद अदीब*
बाभूळगाव:- शेतक-यांचा शेतात पिकलेला माल घेवुन त्यावर प्रक्रीया करून बाजारामध्ये विकणे व त्या माध्यमातून शेतक-यांचे जीवनमान उंचावणे यासाठी तालुक्यात शेतकरी उत्पादक कंपन्यांची निर्मीती करण्यात आली आहे. अश्याच एक शेतकरी उत्पादक कंपनी निवांत-अॅग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी बाभूळगाव या कंपनीच्या युनिटला दि. 27 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी कंपनीद्वारा राबविण्यात येणा-या उपक्रमांची प्रशंसा केली.
बाभूळगाव तालुक्यातील निवांत-अॅग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी ही शेतक-यांची कंपनी आहे. यामध्ये सुमारे 350 शेतकरी सभासद असून दहा संचालक आहेत. या कंपनीद्वारे बाभूळगाव येथील युनिटमध्ये दालमील, गहू फिल्टर, पशुखाद्य, घरचे बीज, ग्रेडींग, क्लिनिंग, सोयाबीनवर तेल, चना दाळ युनिट इत्यादि उपक्रम राबवून शेतक-यांना मदत केली जात आहे. कपंनीच्या सम्राट दाल मील या हर्षिता नगरी येथील युनिटला जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी भेट देवून युनिटमधील यंत्रणेची पाहणी केली.
यावेळी कंपनीचे अध्यक्ष आशिष दिघाडे यांनी कंपनीच्या युनिटच्या संचलन व भविष्यातील उपक्रमासंदर्भात जिल्हाधिकारी यांना माहिती दिली. त्याच प्रमाणे तालुक्यातील व जिल्ह्यातील पहिला प्रयोग असलेल्या अॅनिमल बँकेची निर्मीती केली असल्यास त्या संदर्भातील माहिती व लाभार्थ्यांची माहिती जिल्हाधिकारी यांनी आशिष दिघाडे यांचेकडून जाणून घेतली. बाभूळगाव तालुक्यातील तूरदाळ इतरत्र दाळींपेक्षा चविष्ठ असल्याने त्याचे ब्रँडींग व पॅकेजिंग करून मार्केटमध्ये आणावे या संदर्भात सुचना दिल्या.
यावेळी जिल्हाधिकारी यांचे सोबत उपविभागीय अधिकारी अनिरूध्द बक्षी, तहसीलदर मीरा पागोरे,गटविकास अधिकारी, रविकांत पवार, तालुका कृषि अधिकारी गोपाल जाधव, आत्मा समितिचे घाटे पंचायत समिति कृषि अधिकारी, कृषि सहायक व पर्यवेक्षक कंपनीचे संचालक पराग शर्मा,मनिष राउत, निखिल दिघाडे, विक्की रामटेके,विक्रम कोंबे, चंद्रशेखर परचाके,अमित कुकडे, साधना सराड,गुणवंत वरखडे ब्रम्हानंद ईंगोले उपस्थित होते