*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब*
सावर ग्रामपंचायत उपसरपंच पदासाठी21 मार्च रोजी सावर येथील ग्राम पंचायत सभागृहात झालेल्या निवडणुकीत भाजपा समर्थित परिवर्तन पॅनलचे नितीन उर्फ गोलु राठी यांची सहा विरूध्द चार मते मिळवित उपसरपंचपदी निवड झाली.
बाभुळगाव तालुक्यातील एकरा सदस्य असलेल्या सावर ग्राम पंचायत मध्ये काँग्रेस समर्पित पॅनलची सत्ता आहे. उपसरपंच मो. इलियास शेख मुसा यांची जानेवारी 2024मध्ये अल्पशा आजाराने मृत्यु झाला. त्यामुळे सावर येथे उपसरपंचाचे पद रिक्त झाले होते.या जागेकरिता दि.21मार्च रोजी गुप्त मतदान घेण्यात आले.
यावेळी उपसरपंच पदासाठी नितीन उर्फ गोलु राठी, सुनील क्षीरसागर व निलोफर सै. अनिस यांनी नामांकने दाखल केली. नामांकान अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या क्षणी सुनील क्षीरसागर यांनी आपले नामांकन मागे घेतल्याने दोनच उमेदवार रिंगणात राहिले त्यामुळे काँग्रेस समर्पित गटाचे व भाजप समर्पित राठी गटाचे पाच- पाच असे संख्या बल झाले. यात गोलू राठी यांना 6 मते मिळाल्याने विजयी ठरले.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी सुरेश फुलमाळी यांनी काम पाहिले.