बाभूळगाव येथील महावितरण कंपनीच्या आवारातील घटना, एका तरुण शेतकऱ्याचा गळफास लावून घेण्याचा प्रयत्न.
बाभुळगाव तालुका प्रतिनिधी -: मोहम्मद अदीब
शेतात पेरलेल्या रब्बी पिकांना पाणी देण्याकरिता वारोवांर खंडित होत असलेल्या वीज पुरवठा मुळे परेशान होऊन व तसेच दोन दिवसापासून शेतशिवारीतील लाईन नसल्याने वारोवर अर्ज देऊन कुठलीही उपाय योजना न केल्याने आज दिनांक 13 रोजी वाटखेड येथील स्वप्नील मुळे 33वर्ष या युवकाने चक्क बाभूळगाव येथील महवितरण कंपनीच्या आवारातील झाडाला फाशी घेण्याचा प्रयत्न केला.
वाटखेड येथील स्वप्नील मुळे वेणी शिवारात 6एकर शेती असून त्यात रब्बी चना व गव्हाची पेरणी केली. परंतु शेत वीजपुरवठा वरोवांर खंडित होत असल्याने व गेल्या दोन दिवसापासून वीज पुरवठा बंद असल्याने पेरलेले पिक कसे वाचवावे या चिंतेत होता वरोवर लेखी तोंडी तक्रार करून ही या बाबत महावितरण कंपनीने लक्ष देत नाही फोन केला तर येथील कर्मचारी फोन उचलत नाही.
त्यामुळे आज गावातील नागरिकांना वीजवितरण कार्यालयात जाऊन फाशी घेतो म्हणून सांगून आला व वीजवितरण कंपनीच्या कार्यालयाच्या आवारात जाऊन आवारातील झाडाला गळफास लावून घेत असता गावातील नागरिकांनी 112 वर फोन केला असता बाभूळगाव पोलीस त्वरित तेथे पोचले परंतु स्वप्नील हा ऐकण्यास तयार नव्हता येथील कार्यकरीअभियंता यांच्या सोबत स्वप्नील यांची दूरध्वनी यावर बोलणे करून दिले 16तारखे पर्यंत प्रश्न मार्गी लावून देण्याचे आश्वासन दिले त्यामुळे पुढील अनर्थ टळला.