बाभूळगाव येथे नागदिवाळी महोत्सव उत्साहात साजरा.

*बाभूळगाव तालुका प्रतिनिधी मोहम्मद अदीब*

आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटना नगर शाखा बाभूळगाव यांचेद्वारा आयोजित नागदिवाळी महोत्सव दि. 19 रोजी सांस्कृतिक भवन येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त गटविकास अधिकारी रमेश दोडके हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून माजी राज्यमंत्री डाॅ. रमेशकुमार गजबे, अरविंद सांदेकर, रमेश गराटे, विष्णुपंत डडमल, राजु नारनवरे, सुधाकर गराटे व्यासपीठावर उपस्थित होते.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून मुठपुजन, खण डायका करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी मार्गदर्शन व सामाजिक प्रबोधन करून आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात गायत्री सावसाकडे यांनी महोत्सवाच्या आयोजनाबाबत सविस्तर माहिती दिली. संचालन पूजा शेंडे यांनी तर आभार प्रदर्शन वैष्णवी बारेकर यांनी केले. दुपारी ४.०० वाजता भव्य शोभायात्रा काढण्यात आली.

महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी देविदास राणे, योगेश बारेकर, कुंदन वाघ, विलास डडमल, गौरव डडमल, गौरव जांभुरे, सचिन जांभुरे, कमलेश गराटे, अभिषेक गराटे, योगेश जांभुळे, उमेश सावसाकडे, प्रतीक हजारे, अनुज जिवतोडे, अंकुश खडसंग, आशिष वाकडे, सागर सोनवणे व शाखेचे कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले. यावेळी तालुक्यातून व परिसरातून आलेले समाज बांधव, महिला, युवक, युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

twenty − seventeen =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.