यवतमाळ जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेची नविन कार्यकारीणी जाहीर.

यवतमाळ जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेची नविन कार्यकारीणी जाहीर.

*बाभुळगाव तालुका प्रतिनिधि मोहम्मद अदीब*

जिल्हाअध्यक्ष पदी आशिष जयसिंगपुरे यांची निवड.

यवतमाळ जिल्हा महसूल केर्मचारी संघटनेचे संघटना प्रमुख डॉ. रविंन्द्र देशमुख यांचे अध्यक्षतेखाली यवतमाळ जिल्हातील सर्व महसूल कर्मचारी, चतुर्थ श्रेणी कर्मचारी, वाहनचालक यांचा विशेष आमसभेत  बाभूळगाव येथील तहसील कार्यालयात  कार्यरत असलेले एनपिएस धारक आशिष अशोकराव जयसिंगपुरे यांची  जिल्हाध्यक्षपदी सर्वांनुमते बिनविरोध  निवड करण्यात आली.

यवतमाळ जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या जुन्या कार्यकारणीचा कार्यकाळ (तीन वर्षाचा) पूर्ण झाल्यामुळे नविन कार्यकारणी गठीत करण्यात आली. तसेच गोपाल जनार्दनराव शेलोकार- सरचिटणीस,  प्रविण नाईकवाड – संघटक  श्रीमती यामिनी कोरे संघटक (महिला), श्रीमती मनिषा चव्हाण (जि.का. पूर्व विभाग) व  रोशनी राठोड (जि. का/पश्चिम विभाग)- कार्याध्यक्ष.

आनंद भगत-कार्याध्यक्ष (स्थानिक/जि. का.),  रवी चव्हाण -कोषाध्यक्ष, रविंद्र मानकर सहकोषाध्यक्ष,  कार्याध्यक्ष- जय राठोड (पूर्व विभाग),  सुदर्शन भिसे- कार्याध्यक्ष (पश्चिम विभाग ),  उपाध्यक्ष- अशोक निमकर- दारव्हा उपविभाग, विष्णु डोळसे- उपाध्यक्ष यवतमाळ उपविभाग, गजानन बलांद्रे – उपाध्यक्ष राळेगाव उपविभाग, सुर्यकिरण भगत उपाध्यक्ष केळापूर उपविभाग, जितु पाटील- उपाध्यक्ष वणी उपविभाग.

विनायक गव्हाणे उपाध्यक्ष उमरखेड उपविभाग, सुभाष मोहोटे – उपाध्यक्ष पुसद उपविभाग,  सहसचिव-घनपाल काळे – दारव्हा उपविभाग, राजू वैद्य उमरखेड उपविभाग, नितीन पाटकुरवार-वणी उपविभाग, शालिनी बुटले – यवतमाळ उपविभाग, राकेश चावरे केळापूर उपविभाग, भाग्यश्री थेर पुसद उपविभाग, विक्रांत खरतडे- राळेगाव उपविभाग, कार्यालयीन सचिव- नितेश वाढई, प्रसिध्दी प्रमुख सतिष कांबळे, क्रिडा व सांस्कृतीक सचिव – अतुल शिंगारे यांची सर्वांनुमते बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी संघटना प्रमुख डॉ. रविंन्द्र देशमुख यांनी नविन कार्यकारणीत नियुक्त सर्वांचे मनापासून अभिनंदन करुन महसूल कर्मचारी संघटना पूर्ण ताकतीने भविष्यात काम करेल असा विश्वास व्यक्त केला. सदर विशेष आमसभेत माजी अध्यक्ष  गजानन टाके, सेवा निवृत्त नायब तहसिलदार अजय गौरकार,  प्रमोद बाकडे  नायब तहसिलदार , अतूल देशपांडे, महादेव गोल्हर तसेच जिल्हातील महसूल कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

thirteen − ten =