बाभूळगावच्या शंकरपटात लक्षा व राना अव्वल.

बाभूळगावच्या शंकरपटात लक्षा व राना अव्वल.

*बाभूळगाव  ता. प्र.मोहम्मद अदिब*

ब गटात हिरा सिकंदर,तालुका गटातून चिमणा मारोती प्रथम.

बाभूळगाव शहरात बसस्थानक जवळील अभय  गुगलीया शेतात भव्य  तीन दिवस शंकरपटाचा थरार  बाभूळगाव वासियांनी  अनुभवला असून यात शंकरपटातील सामान्य गटात  अ  गटात हिवरा येथील साहेबराव पाटील  7.30 सेकंदात  धूम ठोकत प्रथम क्रमांकाचे 51001 बक्षीस तर ब गटात नवनाथ  महाराज वखारी वडगाव यांच्या हिरा व सिकंदर याजोडीने धूम ठोकत 7.61 सेकंद  पॉईंट कमी वेळात अंतर कापून प्रथम क्रमांकाचे  21001रुपयांचा पुरस्कार प्राप्त केला.

तर तालुका गटातून प्रथम क्रमांक शेखर अर्जुने डेहणी  यांच्या चिमणा-मारोती या जोडीने 8 सेंकद 68 पॉईंट घेत प्रथम स्थान पटकाविले.
,तिसऱ्या दिवशी चाललेल्या शंकर पट स्पर्धेची समाप्ती झाली. पटात क्रमांकप्राप्त बैलजोडीचे मालक व धुरकरी यांना पुरस्कार रोख रक्कम व चषक देवून गौरविण्यात आले.

बक्षिस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री वसंत पूरके तर प्रमुख अतिथी म्हणून जि.प.माजी सभापती  भिमसिंग सोळंके, माजी जि.प. अध्यक्ष अशोकराव घारफळकर,माजी उपसभापती प.स. अतुल देशमुख, नरेंद्र कोंबे, मुकेश देशमुख, ख.वि. संघाचे अध्यक्ष श्रीकांत कापसे, कृउबा समितीचे संचालक आशिष सोळंके बाभूळगाव न.पं.उपाध्यक्ष श्याम जगताप.

खविसचे उपाध्यक्ष सतीश ठाकरे, काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष मोहन बनकर, कृउबा समितीचे सभापती राजू पांडे, प्रदीप नांदुरकर, मोहन भोयर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन कृउबा समितीचे संचालक अमोल कापसे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

one × four =