दुर्मिळ जातीचा हा विषारी साप महाराष्ट्रात आढळला.

दुर्मिळ जातीचा हा विषारी साप महाराष्ट्रात आढळला.

*बाभुळगाव ता प्र.मोहम्मद अदिब*

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

बाभुळगाव तालुक्यातील आसेगाव (देवी) येथील नागरिक गौरव सुखदेवराव आरेकर यांनी त्यांच्या घरात साप असल्याची माहिती फोनद्वारे “जाणीव एक हात मदतीचे” वन्यजीवरक्षक दुशांत शेळके यांना दिली. दुशांत शेळके यांनी घटनास्थळ गाठून हा साप सुरक्षितरित्या हाताळून पकडण्यात आला. सापाचे निरक्षण केल्यावर हा साप पिवळ्या ठिपक्यांच्या कवड्या साप(yellow spotted wolf snake) असल्याचे कळाले.

ह्या सापाला “जाणीव एक हात मदतीचा” यवतमाळ जिल्हाध्यक्ष दिनेश तिवाडे यांच्या समवेत वन विभागात नोंद करून जंगलात मुक्त केले. सदर साप हा बिनविषारी आहे. दुर्मिळ जातीचा हा साप काळ्या रंगाचा असून शरीरावर पिवळे ठिपके व आडवे पट्टे आहेत. पोटाकडील भागावर पांढरे ठिपके आहेत. या सापाची लांबी एक ते दीड फूट एवढी असते. या सापाच्या प्रजननाचा काळ जून व जुलै असून मादी एकावेळी दोन ते चार अंडी घालते. बिनविषारी असलेला हा साप देशात फार कमी ठिकाणी आढळतो.

सर्वसाधारणपणे यापूर्वी मध्यभारत, उत्तर -पश्‍चिम घाट, मध्य पश्‍चिम भारत या भागामध्ये या सापाची नोंद करण्यात आली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील पश्‍चिम घाट जवळील काही भागात तसेच नाशिक, पुणे, मुळशी, तळेगाव, सांगली, बुलढाणा, गुजरातमधील काही भागात आढळल्याचे समजते. हा साप शांत व लाजाळू असून त्यांचे मुख्य अन्न हे पाली, सरडे, कीटक आदींवर आपली गुजराण करतात.

विदर्भात या सापाची प्रजाती आढळून येत नाही, अशी माहिती वन्यजीवरक्षक दुशांत शेळके यांनी दिली. आणि कुठेही साप अथवा वन्यप्राणी धोक्यात किंवा जखमी अवस्थेत आढळल्यास “जाणीव एक हात मदतीचा” या संस्थेशी संपर्क साधावा असे आव्हाहन केले.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

nine − two =