विद्युत प्रवाहात अचानक वाढ विद्युत उपकरणे जळाली.

विद्युत प्रवाहात अचानक वाढ विद्युत उपकरणे जळाली.

*बाभुळगव ता. प्र.मोहम्मद अदिब*

बाभूळगाव येथील वार्ड क्र. 2, नर्मदा ले आऊट मधील आज दि.22 एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता विज प्रवाह अचानक वाढून येथील नागरिकांच्या घरातील विद्युत उपकरणे जळून मोठे नुकसान झाले याबाबतची तक्रार या वार्डातील  यांनी कार्यकारी अभियंता म. रा वि. वितरण कंपनी यवतमाळ यांच्या कडे केली असून,यात नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

बाभूळगाव नगर पंचायत हद्दीतील वार्ड क्र. 2, नर्मदा ले आऊट मधील रहिवाशी नागरिकांच्या घरातील विद्युत उपकरणे विज प्रवाह अचानक वाढल्यामुळे जळून मोठे. झालेल्या नुकसानाचा याचा सर्व्हे करून नुकसान भरपाई देण्यात यावी  याबाबत आपण काहीच कार्यवाही न केल्यास आम्ही लोकशाही मार्गाने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल व त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

यावर मो जावेद मो.रफीक,बाबा खान,सादीक, अब्दुल मजीद शादीक शेख फरीद प्रविण माइंदे, उकंड गबने, राजेश रावेकर, शंखर दांडेकर, किशोर साठवणे अ. हमीद अ.कयुम आदीच्या स्वाक्षऱ्या आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

17 − 7 =