बाभूळगाव खोदून ठेवलेला रस्ता केव्हा बनवणार नागरिकांचा प्रश्न?
*बाभुळगाव तालुका प्रतिनिधि मोहम्मद अदीब*
बाभूळगाव धामणगाव रस्त्यावर नांदुरा गावाजवळ गेल्या पंधरा दिवसांपूर्वी डांबर रस्ता पॅचेस लावण्या करिता खोदून ठेवला आहे. हा रस्ता कधी दुरुस्त केला जाणार ? असा साधा प्रश्न वाहनधारकांकडून विचारण्यात येत आहे. सतत वर्दळीचा बाभूळगाव धामणगाव अर्धा रस्ता साठ ते सत्तर फुटापर्यंत खोदून ठेवण्यात आला आहे. यामुळे वाहनधारकांना वाहन चालवताना कमालीची कसरत करून आपले वाहन पुढे न्यावे लागत आहे.
विशेष म्हणजे धामणगाव कडून बाभूळगाव कडे येणारी वाहने खोदलेला रस्ता पाहून चालक अचानकपणे उजव्या बाजूला वळवितात. यामुळे लहान मोठे अपघात नित्याची बाब झाली pआहे. दरवर्षी होणाऱ्या रस्ता अपघाताची संख्या कमी करण्यासाठी शासन स्तरावर मोठे प्रयत्न केले जात आहे. मात्र येथे दोषपूर्ण असलेला रस्ता पॅचेस लावण्याकरिता पंधरा दिवसापूर्वी पासून खोदून ठेवण्यात आला आहे.
रस्त्यातील गिट्टी वर आल्याने लहान-मोठे अपघात होत आहे. खोदून ठेवलेला हा रस्ता कधी दुरुस्त होईल ? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून विचारला जात आहे. संबंधित विभागाने लक्ष द्यावे व मोठा अपघात होण्यापूर्वी तातडीने रस्ता दुरुस्त करावा अशी नागरिकांची मागणी आहे.