*बाभुळगाव ता प्र मोहम्मद अदीब*
बाभूळगाव तालुक्यातील सरूळ या गावी पवित्र रमजान महिन्याचा महत्त्वाचा समजला जाणारा 26 वा उपवास सोडवण्याची गेल्या वीस वर्षापासूनची परंपरा विलास सोळंके परिवाराने कायम ठेवली. त्यांच्या या उपक्रमा ची परिसरात प्रशंसा केली जात आहे. तालुक्यातील सरूळ या गावी बोटावर मोजण्याइतकी मुस्लिम समाजाची कुटुंबे वास्तव्यास आहे. मात्र येथे सामाजिक सलोखा मोठ्या प्रमाणावर पहावयास मिळतो.
बेंबळा जैविक शेती शेतकरी उत्पादक कंपनीचे उपाध्यक्ष विलास सोळंके यांनी गेल्या वीस वर्षांपूर्वी पवित्र रमजान महिन्यात 26 वा उपवास सोडविण्याच्या सुरु केलेल्या प्रथेला त्यांनी कायम जपले व सातत्य कायम ठेवले. मुस्लिम धर्मीयांच्या पवित्र रमजान महिन्याचा 26 उपवास शनिवारला सायंकाळी विलास सोळंके यांच्या निवासस्थानी सोडविण्यात आला.
यावेळी गावातील सर्व मुस्लिम समाजाचे स्त्री-पुरुष, बालगोपाल स्वतः मौलाना विलास सोळंके यांच्या निवासस्थानी गोळा झाले होते. तेथेच उपवास सोडण्यात आला व नमाज अदा केल्या गेली. उपवास सोडल्यानंतर विलास सोळंके यांच्याकडून मौलाना यांना रोख रक्कम, महिलांना साडी – चोळी, पुरुषांना टोपि, शेला देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
सामाजिक सलोखा वृद्धीगत व्हावा या करिता गेल्या 20 वर्षापासून सातत्य ठेवून आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमा प्रसंगी आयोजक विलास सोळंके, उपसरपंच राहुल वाघ, श्रीहरी सोळंके, आनंद सोळंके, प्रेस क्लबचे अध्यक्ष आरिफ अली, पवन सोळंके, रमेश भिवरीकर, मौलाना गुलाब शाह, शेख बब्बू भाई, रहीम शेख, साबीर शेख, अवसाफ अली, इस्माईल शेख, शेख गुलाब, अमजद शेख, असलम शेख, सलमान शेख, आशिक शेख प्रामुख्याने उपस्थित होते. सामाजिक सलोखा अधिक वृध्दिगत व्हावा या हेतूने सोळंके परिवाराने गेल्या वीस वर्षापासुन सुरु केलेल्या या सामाजिक उपक्रमाची सर्वत्र प्रशंसा केली जात आहे