दोन समाजाचा मध्ये वाद घडवून आणणाऱ्याला प्रशासन सोडणार नाही – उपविभागीय पोलीस अधिकारी, दिनेश बैसाणे

दोन समाजाचा मध्ये वाद घडवून आणणाऱ्याला प्रशासन सोडणार नाही – उपविभागीय पोलीस अधिकारी, दिनेश बैसाणे

*बाभुळगाव तालुका प्रतिनिधि मोहम्मद अदीब*

गावात वाद तंटे होणार नाही याची दक्षता पोलीस पाटील व शांतता कमिटीचे सदस्यांनी घ्यावी. कुठलीही भांडण न होता येणारी निवडणूक व सण शांततेने पार पाडावे. पोलीस कर्तव्य म्हणून त्याचे काम पार पाडणार आहे परंतु यासोबत प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे प्रशासनाला सहकार्य केले पाहिजे, तसेच दोन समाजाचा मध्ये वाद घडवून आणणाऱ्याला प्रशासन सोडणार नाही असा दम  उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश बैसाणे यांनी भरला.

स्थानिक पोलिस ठाण्याच्यावतीने येणारे विविध धार्मिक सण, लोकसभा निवडणूक या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (ता.5) येथील पोलीस ठाण्याच्या प्रारंगणात आयोजित शांतता समितीच्या बैठकीमध्ये दिनेश बैसने हे बोलत होते. यावेळी  बाभूळगाव येथील ठाणेदार सुनील हुड व उपनिरीक्षक तेलगोटे हे उपस्थिती होते. पुढे बोलताना दिनेश  बैसाने  म्हणाले, एप्रिल महिना हा पोलिस प्रशासनासाठी व्यस्त महिना असून या काळात सर्वच धार्मिक सण येतात. यावर्षी त्यामध्ये लोकसभा निवडणुकीची भर पडली. या पार्श्वभूमीवर शांतता ठेवण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करा.

कुठेलाही अनुसूचित घटना घडल्यास घटनेची माहिती त्वरित पोलीस स्टेशनला द्या, सण उत्सव साजरे करीत असतांना इतर धर्मांना त्रास होऊ नये याची दक्षता घाव्यी. पोलीस पाटील प्रशासनाचा महत्त्वाचा दुवा आहे या पदाला वैज्ञानिक मान्यता आहे पोलीस पाटलांनी कायदा न मोडता आपल्या चौकटीत राहून आपले कर्तव्य बजावले पाहिजे. पोलीस तुमच्या साठी तत्पर असून जरी येथे स्टॉप  कमी असला तरी चांगली सेवा देण्याचे काम करण्याचा प्रयत्न राहील  सर्व सामान्य जनतेला कुठलाही त्रास होणार नाही.

याची दक्षता सर्व कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या परंतु यात गावातील नागरिकांची भुमिका फार महत्वाची आहे असे मत बाभुळगावचे ठाणेदार सुनील हुड यांनी व्यक्त केले. यावेळी शांतता कमिटीचे सदस्य आरिफ अली,भारत ईंगोले, प्रकाशचंद्र छाजेड़,तर पोलिस पाटिल अशोक गेडाम यांनी आपले मनोगत व समस्यांवर चर्चा करण्यात आली या बैठकीत शांतता समितिचे सदस्य पोलिस पाटिल, प्रतिष्ठित नागरिक पत्रकार आदि मोठया संख्या ने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

5 + 4 =