बाभुळगाव तालुक्यात अवैध वृक्षतोड जोमात!
*बाभुळगाव ता प्र.मोहम्मद अदिब*
वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज.
– वन विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्याच्या दुर्लक्षित कारभारांमुळे तालुक्यात खुलेआम अवैधरीत्या वृक्षतोड होत आहे. तोडलेल्या वृक्षांची लाकडे ट्रैक्टर व ट्रकने येथील विनाअडथळा राजरोसपणे भरून नेले जात आहे.यामुळे शासनाची वनसंपदा नस्ट होण्याच्या मार्गावर आहे.या अवैध वृक्षतोडीकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची गरज आहे.
एकीकडे शासन वृक्ष लागवड करण्यासाठी प्रयत्न करीत असून त्यावर कोट्यावधी रुपये खर्च करत आहे. दुसरीकडे बाभूळगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर हिरवी कंच झाडे बाभूळ या झाडासह आडजात सुद्धा कोणतीही परवानगी न घेता सर्रासपणे कापली जात आहे. तर चोरांनी बाभूळगाव पासून जवळ असलेल्या कोपरा बारड येथील गावठाणा मधील बाभूळी कापून काढल्या हा प्रकार सुरू असताना ग्रामस्थांनी विरोध करून चोरांना पिटाळून लावले.
यानंतर या चोरीची लेखी तक्रार वन विभाग व पोलीस स्टेशन यांच्याकडे करण्यात आली आहे. दररोज पेट्रोलवर चालणाऱ्या मशीन द्वारे काही मिनिटात मोठ, मोठी झाडे कापून काढली जात वनविभाग मात्र गाढ झोपेत असल्याचे चित्र तालुक्यात पाहावयास मिळत आहे. वन विभागाने हा भाग वाळवंट बनविण्याचा ठेका घेतला काय ? असा संतप्त सवाल वृक्षप्रेमीतून उपस्थित करण्यात येत आहे.
तालुक्यात दहा-बारा लोकांची एक गॅंग झाडे पहात फिरत असतांना दिसत आहे. नंतर शासकीय जागेवरील झाडे सर्रास कापली जात आहे. बेंबळा धरणाच्या पायथ्याशी सुद्धा असाच काहीच प्रकार निदर्शनास येतो. झाडांचे बुंदे नुकतेच कापून काढलेले आढळून येतील. मात्र याकडे कोणाचेही लक्ष नाही. बेंबळा
प्रकल्पावरील यंत्रणा काय करते हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो.
आता चोरांची हिम्मत एवढी वाढली की, त्यांनी बारड,कोपरा या पुनर्वासित गावाला अगदी लागुन असलेल्या गावठाणातील बाभळींची मोठ,मोठी झाडे पेट्रोलवर चालणार्या आरा मशीन ने कापली लागूनच गाव असल्याने ग्रामस्थ गोळा झाले ग्रामस्थांचा अवतार पाहुन चोरांनी काढता पाय घेतला,नंतर ग्रामस्थांनी संघटितपणे लेखी तक्रार सर्व संबंधितांकडे केली आहे वन विभागाने घटनास्थळाचा पंचनामा केला असून चोराचा शोध कसा लावता जातों,झारीतील शुक्राचार्य कोण?याकडे ग्रामवासियांचे लक्ष लागले आहे