शेतकऱ्यांचा मागण्यासाठी उबाठा गटाचे तहसिलवर मोर्चा.

शेतकऱ्यांचा मागण्यासाठी उबाठा गटाचे तहसिलवर मोर्चा.

*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब*

बाभुळगाव तालुक्यातील शेतकऱ्याच्या  विविध मागण्यासाठी तहसील कार्यालयावर दि.29 फेब्रुवारी रोजी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षा च्या वतीने शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी कापूस सोयाबीन या पिकाचा पिकविमा शेतकऱ्यांना अजून पर्यंत मिळाला नाही तो त्यांना लवकरात लवकर देण्यात यावा. तसेंच फेब्रुवारी महिन्यात झालेल्या गारपीट मुळे त्याची नुकसान भरपाई सरसकट 50000 देण्यात यावी.

तसेच evm मशीन वर मतदान न घेता मतपत्रिका यावर मतदान घ्यावे. दिल्ली मध्ये शेतकऱ्या वर होत असलेल्या अत्याचार बंद करून m s p हा कायदा लागू करावा अश्या शेतकऱ्यांच्या विविध मागण्या घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षा चे शिवसैनिक तहसील कार्यालयावर धडकले  व तहसीलदार यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले.

यावेळी गजानन पांडे तालुका प्रमुख , सचिन माटोडे शहर प्रमुख, ,दिनेश इंगळे ,अनिल गावंडे,शैलेश भगत, चंन्द्रशेखर केलतकर ,रामेश्वर पेरकुंडे, आदिनाथ पुरी,कुणाल गावंडे,सतीश कावळे,खुशाल हिवरकर,प्रवीण काळे, अंकुश लांडे,सागर भोयर,सुयोग धवने,रफिक शहा,श्रीकांत घोंगडे,विजय ढोकणे , संजय चौधरी, पंडितराव बुल्ले, संजय मुळे, दिगंबर मडावी, सुभाष परचाके, रोशन गायकवाड, तेजस गावंडे, पंडित कोरडे, जमीर भाई पठान, सचिन चौधरी, महादेव गायकवाड, शंकर तेलरांगे,  राजेंद्र जगताप, बारकू केसकर ,दिलीप गावंडे, प्रकाशराव घोडे, नामदेवराव घोडे ,इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ten − 10 =