*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब*
Babhulgaon Crime: घरीच एका 85 वर्ष महिलेचा आकस्मित मृत्यू झाल्याची घटना बाभूळगाव तालुक्यातील रेणुकापूर येथे दि.2डिसेंबर रोजी दुपारी 1वाजताच्या सुमारास घडली.
सिंधूबाई भरत पोवते 85 वर्ष रा. रेनुकापुर असे मृतक महिलेचे नाव आहे. विश्वास भरत पोवते व त्यांची पत्नी हे दोघेही शेतात कामासाठी गेले होते. मृतक सिंधूताई व तिचा नातू महेश विश्वास पोवते 26वर्ष हे दोघेच घरी होते.
मृतक सिंधूबाई ही खाली पडून असल्याचे गावातील दोन लहान मुलांनी शेतात जाऊन फिर्यादी विश्वास याला माहिती दिली. लगेच घरी येऊन पाहता सिंधूबाई ही मृतक अवस्थेत पडली होती. सदर घटनेची लेखी तक्रार विश्वास भरत पोवते रा. रेणुकापूर यांनी बाभूळगाव पोलीस स्टेशनला दिली असून पोलिसांनी तूर्तात आकस्मित मृत्यूचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास बाभुळगांव पोलीस करीत आहे.