बाभूळगाव भूमी अभिलेख कार्यालय रामभरोसे.

बाभूळगाव भूमी अभिलेख कार्यालय रामभरोसे.

*बाभुळगाव तालुका प्रतिनिधी मोहम्मद अदीब*

बाभूळगाव येथील तालुका निरीक्षक भूमि अभिलेख कार्यालयात नागरिकांना लहान, लहान कामासाठी हेलपाटे खावे लागत आहे. अनेक नोंदी घेतल्या जात नाही. आवक, जावक मध्ये दिलेला अर्ज जवळच पाच फूट अंतरावर बसून असलेल्या संबंधित कर्मचाऱ्याकडे हा अर्ज पोहोचण्यासाठी अनेक दिवस लागतात. विचारणा केली असता कर्मचारी टोलवा, टोलवीची उत्तरे देतात. सदर कार्यालयातील कर्मचारी मुख्यालयइ राहत नाही.

यामुळे कार्यालयात उशिरा येऊन वेळे पूर्वी निघून जातात. यामुळे तालुक्याच्या खेडेगावातून येणाऱ्या शेतकऱ्यांना, प्लॉट धारकांना या बाबीचा कमालीचा त्रास सहन करावा लागतो. शासनाने पाच दिवसाचा आठवडा करून कामाचे तास वाढविले मात्र कार्यालयीन वेळेत कोणीही कर्मचारी कार्यालयात पोहोचत नाही. प्रत्येक शनिवार व रविवारची सुट्टी असल्याने शुक्रवारच्या दुपारीच बहुतांश कर्मचारी आपापल्या गावाकडे निघून जातात.

कार्यालयातून शुक्रवारी दुपारीच निघालेला कर्मचारी सोमवारच्या दुपारी परत येतो. यामुळे खेड्यातून आलेल्या नागरिकांची कामे वेळेत होत नाही. तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये गेल्या अनेक वर्षापासून सिटीसर्वे झालेला नाही. सिटी सर्वे झालेला नाही. असा प्रमाणपत्र भूमि अभिलेख कार्यालयाचा असल्याशिवाय खरेदीखत नोंदवले जात नाही. या प्रमाणपत्रा साठी आवक, जावक मध्ये दिलेला अर्ज बाजूच्या टेबलवर पोहोचण्यासाठी अनेक दिवस लागतात.

यामुळे आंधळं दळतं आणि कुत्र पीठ खातं अशी अवस्था सदर कार्यालयाची झाली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कार्यालयीन वेळात किती कर्मचारी हजर असतात याची माहिती घेण्याकरिता आकस्मिक भेटीची गरज आहे. मुख्यालयी न राहता बहुतांश कर्मचारी न चुकता दर महिन्याला घर भाडे भत्ता घेतात. खोटी कागदपत्र दाखवुन मुख्यालयी राहत असलयाचा दाखला जोडणार्या कर्मचारया वर कायदेशिर कार्यवाही करावी व नागरिकांना होणारे हेलपाटे थांबवावे अशी मागणी त्रस्त नागरीकांकडुन केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

5 × 3 =