विरखेड फाट्या जवळील घटना, बहिरम वरून देवदर्शन करून येत असतांना टाटा सुमो उलटून 1 ठार 5 जण जखमी.

*बाभुळगाव तालुका प्रतिनिधि मोहम्मद अदीब*

बहिरमवरून देवदर्शन करून निघालेल्या टाटा सुमो वाहन पलटी झाल्याने 1 ठार 5 जण जखमी झाले.हा अपघात दिनांक 17जानेवारी रोजी रात्री7.30 वाजताच्या दरम्यान धामणगाव रोडवरील विरखेड फाट्या जवळ घडला. उमेश वसंतराव गौरशेट्टीवार 55 वर्ष रा.जामरोड यवतमाळ असे मृतकाचे नाव असून राजेश योगेश फसाटे 55, यवतमाळ,प्रमोद वसंतराव पिळवटकर 57 यवतमाळ, प्रमोद रामराव कन्हाके 43 देवनाळा (जोडमोहा), निळकंठ उत्तमराव सोळंके 44 ब्रम्हणी ,( दारव्हा,) चालक ज्ञानेश्र्वर विठ्ठल नाटकर 67 वाघापूर (यवतमाळ) असे जखमिंचे नावे आहेत.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

MH32C7965 टाटा सुमो ही बहिरम वरून देवदर्शन करून यवतमाळ येथे भरधाव वेगाने जात असतांना अचानक समोरून वाहन आल्याने  धामणगाव रोड वरील विरखेड फाट्या जवळ चालकाने ब्रेक मारला असता गाडी अनियत्रीत होऊन पलटी झाली. यात  एक चालक व 8 जण होते. जखमींना उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालय बाभूळगाव येथे भरती करण्यात आले. प्राथमिक उपचार करून यवतमाळ शासकिय रुग्णालयात पाठविण्यात आले.तर मृतकाचे शिवविच्छेदन करण्यात आले. प्रमोद रामराजी कन्हाके ४३ देवगाव ता. कळंब याने दिलेल्या फिर्यादीवरून चालक ज्ञानेश्र्वर विठ्ठल नाटकर 67 रा.यवतमाळ याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

17 − 4 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.