एकलव्य इंग्लिश स्कूल नांदाफाटा येथे डॉ. Babasaheb Ambedkar Jayanti साजरी.

एकलव्य इंग्लिश स्कूल नांदाफाटा येथे डॉ. Babasaheb Ambedkar Jayanti साजरी.

*चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी प्रमोद खिरटकर*

भीमगीताने जागविल्या बाबासाहेबांचा आठवणी

Babasaheb Ambedkar Jayanti: कोरपना तालुक्यातील एकलव्य इंग्लिश स्कूल नांदाफाटा येथे भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या प्रारंभी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मुख्याध्यापक नितेश शेंडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळीप्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्याध्यापक अखिल अतकारे, शाळेचे शैक्षणिक विभागाचे प्रमुख विठ्ठल टोंगे, प्रफुल विरुटकर उपस्थित होते.

जयंतीचे औचित्य साधून मेर्वी शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजम करण्यात आले होते यामध्ये रितिका पवार,आत्राम नम्रता मडावी आदी विद्यार्थ्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी माहिती सांगितली. शिक्षिका पल्लवी खाडे यांनी भीमगीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी विठ्ठल टोंगे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्याध्यापक अखिल अतकारे यांनी केले. संचालन शिक्षिका श्वेता आस्वले तर आभार अनिता मिस्त्री यांनी मांडले. यावेळी मोठ्याप्रमाणावर विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

seventeen − 4 =