Suicide Case: विरखेड येथील घटना!

*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब* Suicide Case: शेतकरी पुत्राची गळफास लावून आत्महत्या! सतत च्या नापीकीला कंटाळून एका तरुणांनी आत्महत्या केल्याची घटना वीरखेड येथे दिनांक 20 मार्च रोजी सकाळी 6 वाजता उघडकीस आली, रितेश राजेंद्र परडखे वय 24 रा. विरखेड असे मृतकाचे नाव आहे. रितेशच्या वडीलाकडे विरखेड शिवारात सर्व नंबर 41 मध्ये 3 एकर शेती आहे,सदर शेती ...
Read more
तांडा येथील ७० हजार रुपयांची गावठी दारू नष्ट.

एक आरोपी अटकेत : राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई. *चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी प्रमोद खिरटकर* लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क वरोरा विभागाच्या वतीने तालुक्यातील तांडा येथे टाकलेल्या धाडीत ७० हजार रुपयांची गावठी दारू नष्ट करण्यात आली. यात एक आरोपी अटकेत आहे. निवडणुकीच्या काळात कुठेही असामाजिक तत्त्वाने शांतता भंग करू नये या हेतूने अवैध दारू व्यवसायिकावर ...
Read more
Murder Case: पत्नी व प्रियकराच्या सोबतीने पतीचा गळा दाबून हत्या.

*पातुर तालुका प्रतिनिधी राहुल सोनोने* Murder Case: वाडेगाव सहायक पोलिस निरीक्षक पंकज कांबळे यांची कामगिरी. पोलिसांनी दोन तासात पत्नी व प्रियकर आरोपीस अटक. पातुर:- बाळापूर पोलीस स्टेंशन अंतर्गत येत असलेल्या ग्राम तामसी येथे वीटभट्टी वरील मजुरांची पत्नी व तिचा प्रियकराच्या संगतीने पतीची गळा दाबून हत्या करण्यात आल्याची घटना १८ मार्च सोमवार रोजी उघडकीस आली आहे. ...
Read more
शौचालय योजना राबवूनही काही ग्रामस्थांच्या हातून टमरेल सुटेना.

*चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी* दारव्हा: तालुक्यातील अनेक गावांतील नागरिकांना हगणदारी मुक्त गाव होण्यासाठी सौचालययाचे लाभ देऊनही हातातील टमरेल सुटता सुटत नाही. यामुळे हगणदारी मुक्त गाव पुरस्कार प्राप्त असताना सूद्धा काही ग्रामस्थांच्या हलगर्जीपणामुळे घाणीचे साम्राज्य पसरत आहे. नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. आरोग्याला घातक रोग राई पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या करीता तालुक्यातील प्रशासनाच्या ...
Read more
Lok Sabha Elections 2024: मनसे – भाजप यांची भाऊबंदी?

Lok Sabha Elections 2024: महायुतीला आता राज ठाकरेंची ताकद मिळणार का? मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची दिल्लीमध्ये अमित शहा सोबत बैठक होणार असल्याची शक्यता आहे. आणि त्यासाठी कालच दिल्लीमध्ये राज ठाकरे रवाना झाले आहेत. महायुतीला मनसेचे इंजन लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मनसेला महायुतीमध्ये घेण्यासाठी वेगाने हालचाली सुरू असल्याची माहिती आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर राज ...
Read more
पोलीस स्टेशन रामदासपेठ अकोला यांची धडक कार्यवाही जबरी चोरी व चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आणले.

*अकोला प्रतिनिधी गुलाम मोहसीन* फिर्यादी श्रीमती. सुशीला. ब्रिजलाल. झुनझुनवाला, वयः ७०, वर्ष, रा. अमृत हाउसींग सोसायटी, सातव चौक अकोला. यांनी जबानी रीपोर्ट दिला की, दिनांक ०२/०३/२४ रोजी सायकाळी १८/४५ वा. चे सुमारास तीवे दोन मैत्रीणी यांचेसह नेहमी प्रमाणे सातव चौक ते रेल्वे कॉलनी या परीसरात पायी फिरत असतांना एक तीन चाकी सवारी अॅटो ने येवुन ...
Read more
Lok Sabha Elections 2024: महाराष्ट्रात मतदान कधी? निवडणूक आयोगाकडून तारखा जाहीर.

Lok Sabha Elections 2024: 17 व्या लोकसभेची मुदत 16 जून 2024 रोजी संपणार आहे. भारतीय राज्यघटनेचा कलम 324 नुसार भारतीय निवडणूक आयोगाला संबंधित अधिकार, कर्तव्ये आणि कार्ये प्रदान करण्यासाठी नवीन लोकसभेची स्थापना करण्याचे, निवडणुका आयोजित करण्याचे वेळापत्रक आले आहे. या घटनात्मक आणि कायदेशीर तरतुदी लक्षात घेऊन, भारताच्या निवडणूक आयोगाने 18 व्या लोकसभेच्या निवडणुका मुक्त, निष्पक्ष, ...
Read more
Darwha Rain: अवघ्या अर्ध्या तासात गारपीट, वादळी पावसाने पीक नेस्तनाबूत.

*चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी* Darwha Rain: तालुक्यात रविवारला वादळवाऱ्यासह पडलेला पाऊस व गारपिटीचा तडाखा बसला. यात काही गावातील रब्बी व उन्हाळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. रविवारला सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास प्रचंड वादळवाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. काही प्रमाणात हरभऱ्याच्या आकाराची गार पडली. केवळ अर्धा, एक तासाच्या आपत्तीमुळे तालुक्यातील काही गावांमध्ये खोपडी, डोल्हारी देऊळगाव, अंतरगाव ...
Read more
यवतमाळ जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेची नविन कार्यकारीणी जाहीर.

*बाभुळगाव तालुका प्रतिनिधि मोहम्मद अदीब* जिल्हाअध्यक्ष पदी आशिष जयसिंगपुरे यांची निवड. यवतमाळ जिल्हा महसूल केर्मचारी संघटनेचे संघटना प्रमुख डॉ. रविंन्द्र देशमुख यांचे अध्यक्षतेखाली यवतमाळ जिल्हातील सर्व महसूल कर्मचारी, चतुर्थ श्रेणी कर्मचारी, वाहनचालक यांचा विशेष आमसभेत बाभूळगाव येथील तहसील कार्यालयात कार्यरत असलेले एनपिएस धारक आशिष अशोकराव जयसिंगपुरे यांची जिल्हाध्यक्षपदी सर्वांनुमते बिनविरोध निवड करण्यात आली. यवतमाळ जिल्हा ...
Read more
Rahul Gandhi: भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप तर INDIA Allianceचे शक्ती प्रदर्शन यांची जुगलबंदी!

Rahul Gandhi यांच्या भारत जोडो न्याय यात्रेची समारोप सभा मुंबईतील शिवाजी पार्कवर 17 मार्च रोजी रविवारी पार पडली. थोडक्यात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ INDIA Allianceने मुंबईत फोडला. राहुल गांधी यांच्या बहिण प्रियंका गांधी वाड्रा यादेखील उपस्थित होत्या. या सभेला दिग्गज नेत्यांची उपस्थितीही पाहण्यात आली त्यामुळे संपूर्ण मुंबईकरांचे तसेच महाराष्ट्राचे लक्ष या सभेकडे लागले होते. समारोपिय ...
Read more