आमदार Ashok Uike यांची केली गारपीटने नुकसानीची पाहणी.
*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब*
शासन दरबारी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश.
शनिवारी 10 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5.30 वाजताच्या सुमारास बाभूळगाव तालुक्यात अचानक वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. यामध्ये गहू हरभरा, व तुरी पिकांचे तीन हजार पाचशे हेक्टर मधील पिके नष्ट झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. गारपिटीने नुकसान झालेल्या गोंधळी, किन्ही, मुबारकपुर, राऊत सावंगी, वडगाव, वाटखेड या गावांना दिनांक 11 फेब्रुवारी रविवार रोजी आमदार Ashok Uike यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी करून नुकसानीचा आढावा घेतला व असून नुकसान झालेल्या भागातील तातडीने पंचनामे करण्याचे आदेश तहसिलदार यांना दिले.
शिवाय शासनाकडून नुक्साची जास्त जास्त मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. यावेळी आ. अशोक उईके यांच्यासह तहसीलदार मीरा पागोरे, सतीश मानलवार, नितीन परडखे, तालुका कृषी अधिकारी सुरेश गावंडे, संजय राठी, सहाय्यक पोलीस निरीक्षक मिलिंद पराडकर, नायब तहसीलदार डी. पी. बदकी, हेमंत ठाकरे, विकी परडखे, अनिकेत पोहोकार, पीरखा पठाण, उमेश बांगडकर, अमोल खडसे, बाबाराव ढोणे, पंचायत समितीचे कृषी अधिकारी के. एस. अंबरकर, विस्तार अधिकारी कृषी सी. एस. हेडाऊ, प्रामुख्याने हजर होते.