Arni Murder Case: आर्णीत कोळवन येथिल युवकाची धारधार शस्त्राने हत्या, एक आरोपीला अटक तर एक फरार.

Arni Murder Case: आर्णीत कोळवन येथिल युवकाची धारधार शस्त्राने हत्या, एक आरोपीला अटक तर एक फरार.

Arni Murder Case: फिर्यादी व मृतकनामे अजय अवधूत तिघलवार वय २३ वर्षे हे दुर्गा माता विसर्जन मिरवणूक पाहण्याकरिता कोळवण येथून मोटरसायकल ने आर्णी येथे आले व मिरवणूक पाहून परत जात असताना भाजी मंडी आर्णी येथे यातील आरोपी यांनी संगणमत करून फिर्यादी व यांचे मोटर सायकल यास अडविले.

त्यामुळे फिर्यादी व मयत हे मोटरसायकल वरून खाली पडले असता आरोपी नामे दत्ता वानखडे यांने त्याचे हातातील चाकूने मयत याचे पोटावर सपासप वार करून गंभीर जखमी केल्यान त्यानंतर फिर्यादी व मृतक यास आर्णी ग्रामीण रुग्णालय येथे नेले असता तेथिल डॉक्टरांनी तपासणी केली असता यांनी गंभिर जख्मी असलेल्या अजय यास मृत घोषित केले अशा फिर्यादीचे जबानी रिपोर्ट वरून सदरचा गुन्हा नोंद करून तपासात घेतला.

काल शहरात दुर्गादेवी विसर्जनाचा कार्यक्रम सुरु असतांना रात्री ९ते १० वाजताच्या दरम्यान कोळवन येथील मृत युवक अजय तिघंलवाड वय २३ वर्ष यांचा धारधार शास्त्राने शहरातील भाजी मंडी परिसरात निर्घुन खुन झाल्याची वार्ता शहरात पसरताच रात्रीच कोळवन येथिल गावक-यांनी आर्णी ग्रामिण रूग्णालयात प्रंचड गर्दी केली.

यावेळी दारव्हा उपविभागीय पोलस अधिकारी आदित्य मिरखेलकर व आर्णी पोलीस स्टेशनचे पोलिस निरिक्षक केशव ठाकरे यांनी काल रात्री पासुनच मृतकांच्या कुंटुंबांची व गावक-यांची समजुत काढण्याचा प्रयत्न केला पण गावकरी आरोपींना अटक केल्या शिवाय पंचनामा करु देणार नाही अशी अट घातल्यांने पोलस प्रशासनावर ताण निर्माण झाला होता.

ग्रामिण रुग्णालया समोर आज सकाळ पासुन गावक-यानी दुतर्फा रस्ता अडविल्याने शहरातुन वाहतुक पुर्ण : ताह बंद झाली होती महसुल प्रशासनाचे उपविभागीय अधिकारी गोपाल देशपांडे,निवासी नायब तहसीलदार आदमुलवाड यांनी आंदोलकांना व मृतकांच्या कुंटुंबीयांना समजाविण्याचा प्रयत्न केला तरी मारेक-यांना अटक केल्या शिवाय आम्ही मृतदेह हालवु देणार नाही.

काल पासुनच आरोपीचा शोधात गेलेल्या पोलिस पथकाला त्यातील एक आरोपी पकडण्यात यश आल्याने उपविभागीय पोलिस अधिकारी आदित्य मिरखेलकर यांनी आंदोलन कर्ताना सांगीतले व त्यातील दुसरा आरोपी सुध्दा लवकरच पकडण्यात येईल पोलिस प्रशासनाकडुन आरोपींना जास्तीत जास्त सजा कशा प्रकारे देता येईल.

यासाठी आपण मृतकांचे शैवविच्छदन करणे गरजेचे आहे त्यासाठी आपण पोलिस प्रशासनास सहकार्य करा असे समजुन सांगितल्याने आंदोलकांनी माघार घेत लगेच ग्रामिण रुग्णालयात ठेऊन असलेला मृतदेह शैवविच्छदनासाठी पाठविण्यात आला त्यामुळे पोलिस प्रशासनाने व महसुल प्रशासनाने सुटकेचा श्वास घेतला यावेळी सकाळीच दंगल नियंत्रक पथक तैनात करण्यात आले होते.

आरोपी विरुध्द कलम ३०२,३४१,३४ नुसार आर्णी पोलीसात गुन्हा दाखल केला आहे ,पुढील तपास दारव्हा उपविभागीय अधिकारी अदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली आर्णी पोलिस निरीक्षक केशव ठाकरे,यांच्या सह आर्णी पोलिस करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

seven + seventeen =