APAAR ID : ‘एक देश, एक स्टूडेंट आयडी’ , जाणून घ्या विध्यार्थ्यांना काय सुविधा मिळणार.केंद्र सरकारने विद्यार्थ्यांचे शिक्षण दस्तावेज सुरक्षित ठेवण्यासोबतच त्यांचे शैक्षणिक भविष्यासाठी “अपार” आय डी कार्ड देण्याची योजना संपूर्ण देशात राबविली आहे.केंद्राने विद्यार्थ्यांसाठी हा महत्त्वाचा पाऊल उचलला आहे. संपूर्ण देशात अपार आयडी रजिस्ट्रेशन साठी शाळांमध्ये अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. आणि याला शिक्षक विद्यार्थी पालक आणि सर्व शासकीय गैरशासकीय आणि खाजगी शाळांमधून भरपूर प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
12 अंकी आयडीने राहणार विद्यार्थ्यांचे दस्तावेज सुरक्षित
देशातील प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे कार्ड
12 अंकी ओळखपत्रामुळे मिळणार अनेक फायदे
काय आहे “Apaar ID”
“अपार आय डी” हा डिजिटल युग मध्ये देशातील प्रत्येक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक रिकॉर्ड डिजिटल लॉकरमध्ये सुरक्षित ठेवण्यासाठी एक सशक्त डिजिटल माध्यम आहे.या अपार प्रकल्पामुळे विद्यार्थ्यांना मिळालेले आय डी आणि अपार ने मॅप केलेल्या सुविधांमुळे विद्यार्थ्यांचे शाळा कॉलेजमध्ये प्रवेश, शासकीय खाजगी स्कॉलरशिप, शैक्षणिक सेवा सुविधा आणि सवलती, क्रेडिट संचय, एका संस्थेतून दुसऱ्या संस्थेत क्रेडिट ट्रान्सफर, स्टूडेंट इंटर्नशिप, सर्टिफिकेट,शासकीय,खासगी नौकरीसाठी ऑनलाईन अर्ज आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक रिकॉर्डचे व्हेरिफिकेशन डिजिटल पद्धतीने खूप सुलभ होणार आहे.
देशाच्या शिक्षण प्रणालीचे डिजिटल युगात प्रवेश.
सरकारकडून देशाच्या शिक्षक प्रणालीत अमुलाग्र बदल करण्यासोबतच शिक्षणाला डिजिटल युगासोबत जोडण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय आहे. विद्यार्थ्यांचे अपार आयडी आणि यासाठी डीजी लॉकर सुविधा महत्वाची ठरणार आहे. अपार योजनेतून सरकार भारतात एक देश एक स्टुडन्ट आयडी हा प्रोजेक्ट राबवीत आहे. यानुसार सरकारकडून देशातील सर्व शाळांच्या माध्यमातून ऑटोमेटेड परमानेंट अॅकेडमिक अकाउंट रजिस्ट्री म्हणजेच “अपार(APAAR ID)” प्रकल्प सरकारने सुरू केले आहे.
विद्यार्थ्यांसाठी “अपार”फायदेशीर.
या प्रकल्पातून शाळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे अपार रजिस्ट्रेशन ऑनलाइन पद्धतीने करण्यास सुरुवात झाली असून अपारमुळे प्रत्येक विद्यार्थ्याला अपारचा आयडेंटिटी कार्ड मिळणार असून हा आधार कार्ड प्रमाणे 12 अंकी आयडी कार्ड राहणार आहे या ओळखपत्रामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणात आणि शैक्षणिक भविष्य तसेच विविध नोकऱ्यांचे आवेदनासाठी फायदे मिळणार आहे. केंद्र शासनाकडून राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 या प्रकल्पात अपारचा समावेश करण्यात आला आहे. अपार रजिस्ट्रेशन करून विद्यार्थ्यांना त्यांची शैक्षणिक सुविधा प्रक्रिया सुलभ करणे,देशात शाळा कॉलेजमधील विद्यार्थी डाटा व्यवस्थापन, विद्यार्थ्याची कार्यक्षमता वाढवून त्यांना व्यक्तिगत आणि पारदर्शक शिक्षणाचा लाभ आणि अनुभव प्रदान करण्यासाठी हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांना भविष्यात अपार फायदेशीर ठरणार आहे.
नेमक काय आहे Apaar ID ?
अपारचा long form “ऑटोमेटेड परमानेंट अॅकेडमिक अकाउंट रजिस्ट्री”हा असून देशभरात यासाठी नोंदणीकृत विद्यार्थ्यांना विशेष ओळखपत्र देण्यात येणार आहे. या आय डी मध्ये 12 अंकांचा कोड असणार आहे. या कोड नंबर नुसार विद्यार्थ्यांचे सर्व शैक्षणिक दस्तावेज क्रेडीट डिजिटल माध्यमातून digitlised स्वरूपात स्टोअर करण्यात येणार आहे. यामुळे सर्व विद्यार्थ्यांना आपले digi locker खाते मॅनेज आणि एक्सेस करण्यास मदत मिळणार आहे. यात student score card, मार्कशीट, ग्रेडशीट, डिग्री, डिप्लोमा, सर्टिफिकेट आदीं digital स्टोर राहणार आहे.
अशी होते Apaar ID डी तयार,
देशभरातील शाळा कॉलेज मधील विद्यार्थ्यांना अपार आयडी मिळणार असून यासाठी सरकारने apaar.education.gov.in या वेबसाईटवर नोंदणी करण्याची सुविधा दिली आहे.यात काही स्टेप फॉलो करून विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात येते.
ह्या आहे स्टेप्स.
#पडताळणी- विद्यार्थी तपशीलची पडताळणी करण्यासाठी सबंधित शाळेला भेट
#पालकांची संमती-विद्यार्थी अल्पवयीन असल्यास त्याच्या पालकांची संमती मिळवा.
#प्रमाणीकरण करणे: त्या शाळेद्वारे विद्यार्थी ओळख सत्यापित करा.
#यशस्वी पडताळणीनंतर, विद्यार्थ्यांचे अपार साठी सुरक्षित ऑनलाइन प्रवेश आणि APAAR आयडी तयार केला जातो यानंतर DigiLocker शी लिंक केला जातो.
हे Documents Apaar ID साठी गरजेचे?.
अपार साठी विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचे युनिक दस्तावेज जरुरी असते.यात युनिक स्टुडंट आयडेंटिफायर (PEN), संबंधित विद्यार्थ्याचे नाव,त्याची जन्मतारीख, लिंग, मोबाईल नंबर,आईचे नाव, वडिलांचे नाव,वडील,किंवा आईचे आधार कार्ड नुसार स्पष्ट नाव,त्यावरचे आधार क्रमांक लागते.
विशेष म्हणजे या डिजिटल युगात प्रत्येक विद्यार्थिसाठी अपारचे भविष्यात खूप फायदे राहणार असून अपार आयडी त्यांचे शैक्षणिक रिकॉर्ड सुरक्षित ठेवण्याचे एक सशक्त माध्यम असेल अपार प्रकल्पातून आय डी तयार झाल्याने अपार सिस्टीम ने मॅप केलेल्या सुविधांमुळे शाळा कॉलेज प्रवेश,सरकारी स्कॉलरशिप, शैक्षणिक सवलती, क्रेडिट संचय, एक संस्थेतून दुसऱ्या संस्थेत क्रेडिट ट्रान्सफर, इंटर्नशिप, सर्टिफिकेट,नौकरीसाठी आवेदन आणि शैक्षणिक रिकॉर्डचे व्हेरिफिकेशन यामुळे करता येईल.