Anil Ambani : Reliance Power कंपनीचा किती कर्जाचा बोजा उतरला अन् अनिल अंबानी कसे झाले कर्जमुक्त?
Anil Ambani : Reliance Power कंपनीचा किती कर्जाचा बोजा उतरला अन् अनिल अंबानी कसे झाले कर्जमुक्त?
एरोनॉटिकल उद्योगात अनुभव नसताना सुद्धा आंतरराष्ट्रीय स्तरावर राफेल सारखे अत्युच्च तंत्रज्ञानाचे विमान खरेदी ची मुभा मिळालेले रिलायन्स पॉवर कंपनी चे मालक अनिल अंबानी मोठ्या प्रमाणात कर्जमुक्त झाले आहे रिलायन्स पॉवर कंपनी वर कर्जाचा मोठा डोंगर होता तो आता उतरला आहे. कर्जमुक्त होतास रिलायन्स पॉवर कंपनीचे शेअर 28 हजार टक्क्यांनी वाढून आठवड्यात 1 लाख वरून 29 लाख झाले.
कोणत्या कंपनीची होती गॅरेंटर अन् जबाबदारी.
उल्लेखनीय म्हणजे रिलायन्स पॉवर कंपनी ही विदर्भ इंडस्ट्रीज पॉवर कंपनीच्या कर्ज प्रकरणात गॅरेंटर म्हणून होती.आता या कंपनीवर कर्जाचा बोजा उतरताच रिलायन्स पावर कंपनीचे मालक असलेले अनिल अंबानी यांच्यावर या कर्ज प्रकरणाची जबाबदारी संपुष्टात येवून त्यांची पॉवर कंपनी 3,872.04 कोटींच्या कर्जातून मुक्त झाली आहे.रिलायन्स पॉवरने वीजनिर्मिती कंपनी विदर्भ इंडस्ट्रीज पॉवर लिमिटेड (VIPL) साठी हमीदार म्हणजेच गॅरेंटर म्हणून आपल्या सर्व आर्थिक जबाबदाऱ्या पूर्ण केल्या आहेत.
मंगळवार 17 सप्टेंबरला कंपनीने याची घोषणा केली आहे.यानंतर कंपनीच्या शेअर्सवर याचा परिणाम होऊन शेयर प्रभाव वाढताना दिसत आहे कर्जमुक्ती होताच अनिल अंबानी यांच्या कंपनीचे शेअर्स या बुधवारी 5% वाढून 32.98 रुपयांवर पोहोचले. विशेष म्हणजे रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये गेल्या 4 वर्षात 2800 टक्क्यांची वाढ झाली आहे.आता विदर्भ इंडस्ट्रीज पॉवरवर 3872.04 कोटींचं कर्ज होतं.या कर्जासाठी गॅरेंटर म्हणून रिलायन्स पॉवर वर बोजा होता तेही आता मिटला आहे. तसेच विदर्भ इंडस्ट्रियल पावर कंपनीवर सुद्धा बँका आणि आर्थिक संस्थांचं कोणतंही कर्ज राहिला नाही.
रिलायन्स पॉवर कंपनीची 30 जून 2024 पर्यंत नेटवर्थ 11 हजार 155 कोटी.
यापूर्वी देशात उद्योग क्षेत्रात अग्रणी असलेले अनिल अंबानी यांच्या कंपन्यांवर कर्जाचा बोस वाढल्याने त्यांचा दिवाळा निघत असताना दिसत होता,मात्र आता अनिल अंबानीं मालक असलेली कंपनी रिलायन्स पॉवरने आता त्यांच्यावर कोणत्याही बँक आणि वित्तीय संस्थांचं कर्ज नसल्याची माहिती दिली आहे.कंपनी व्यवस्थापनानुसार आता रिलायन्स पॉवर कंपनीची 30 जून 2024 पर्यंत एकत्रित नेटवर्थ 11,155 कोटी आहे.सोबतच रिलायन्स पॉवरने एक्स्चेंज फायलिंगमध्ये ही माहिती देण्यात आली आहे की. विदर्भ इंडस्ट्रीज पॉवर लिमिटेड वर कर्जाचा बोजा उतरतात आणि अनिल अंबानी यांच्या पावर कंपनीची गॅरंटी कर्ज प्रकरणात समाप्त झाल्यानंतर ही रिलायन्स पॉवर ची उपकंपनीसुद्धा राहिलेली नाही.सीएफएम रिकंस्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडसह सर्व वाद मिटवले असल्याची माहितीही कंपनीने यानिमित्ताने दिली आहे.
कंपनीचे शेअर होल्डर फायद्यात राहणार.
अनिल अंबानी यांच्या कंपनीचे शेअर्स 27 मार्च 2020 रोजी 1.13 रुपयांवर होते. कंपनीचे शेअर्स 18 सप्टेंबर 2024 रोजजी 32.98 रुपयांवर पोहोचले. 27 मार्च 2020 रोजी पर्यंत रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये 1ज्यांनी लाख गुंतवून कायम ठेवले असेल तर आता त्या 1 लाखांच्या शेअर्सचं मूल्य 29.18 लाख रुपये होणार आहे. विशेष म्हणजे रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये 52 आठवड्यातील सर्वाधिक मूल्य 38.07 रुपये राहिले. तर 15.53 रुपये सर्वात निचांक मूल्य आहे.या कंपनीची एका वर्षात शेअर प्रोग्रेस 73% नोंद करण्यात आली आहे.रिलायन्स पॉवर्सच्या कंपनीचा शेअर 18 सप्टेंबर 2023 पर्यंत 19.7 रुपयांवर होता.यानंतर हे शेअर्स 18 सप्टेंबर 2024 पर्यंत 32.98 रुपयांवर पोहोचले.गेल्या 6 महिन्यात कंपनीच्या शेअर्समध्ये 42 टक्क्यांची वाढ झाली आहे.