Anglo Hindi High School: सालिया अंजुम समीर खान ही विद्यार्थिनी १३ वर्षाची आहे पण १९ वर्षाखालील ग्रुप मध्ये ४ किलोमीटर स्पर्धेत विभागीय स्तरावरिल ३०-४० विद्यार्थिनीं मधून द्वितीय क्रमांक प्राप्त करुन चंद्रपुर येथे होणाऱ्या राज्य स्तरावरिल स्पर्धेकरिता हिची निवड झालेली आहे. राज्य स्तरीय मैदानी स्पर्धा दि २९ ऑक्टोबर ते २ नोवेम्बर दरम्यान चंद्रपुर येथे होईल. या स्पर्धेत सालिया अंजुम खान ४ किलोमीटर स्पर्धेत सहभागी होईल.
शाळेतर्फे मुख्याध्यापिका अंशुल जैन तसेच सर्व शिक्षक वृंदांनी तिचे कौतुक केले आहे. तसेच शाळेचे सचिव किर्ती बाबू गांधी यांनी तिचे अभिनंदन करून तिला राज्यस्तरीय स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या आहेत. सालिया अंजुम समीर खान हिने तिच्या यशाचे श्रेय प्रशिक्षक संजय सातारकर व कोमलसिंह बघेल तसेच आईवडिल, मुख्याध्यापक अंशुल जैन व सर्व शिक्षक वृंदांना दिले आहे.