Anganwadi Bharti 2025 : राज्यात विविध जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अंगणवाडी सेविकांची भरती करण्यात येणार आहे.महाराष्ट्रात एकूण 18000 अंगणवाडी सेविका, मदतनीस सेविका या पदांसाठी या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून निवड होणार आहे. महाराष्ट्रात 12 वी उत्तीर्ण महिला उमेदवारांसाठी नोकरी मिळविण्याची चांगली संधी महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र सरकारने उपलब्ध केलेली आहे.
नोकरी ग्रुप जॉईन करण्यासाठी : येथे क्लिक करा
महिला व बालविकास विभाग तसेच बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याद्वारे 18 हजार पेक्षा अधिक पदे भरण्यासाठी नुकतीच जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.याकरिता पात्र उमेदवारांना अर्ज भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.पद भरती जाहिराती ज्या विभागात पदे रिक्त आहे अशा बालविकास प्रकल्पाधिकारी यांच्याद्वारे प्रकाशित करण्यात आलेले आहेत.
Anganwadi Bharti 2025 : अंगणवाडी सेविका पद भरती संदर्भात ही आहे माहिती.
- भरती विभाग
महिला व बालविकास विभाग अंतर्गत ही भरती होत आहे.
- भरतीचा प्रकार
महाराष्ट्र शासनाच्या मान्यतेने अंगणवाडी सेविका सेविका मदतनीस भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.
- एकूण पदे
18000+
- पदे
अंगणवाडी सेविका, सेविका,अंगणवाडी मदतनीस.
- शैक्षणिक पात्रता
बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक
- अर्ज स्वीकारण्याची पद्धती
वरील पदांसाठी अर्ज स्वीकारण्याची पद्धती ऑफलाइन आहे ऑफलाइन पद्धतीने या पदांसाठी अर्ज स्वीकारले जात आहे
- वयोमर्यादा
18 ते 35 वर्षे,{विधवा महिलांना कमाल 40 वर्ष पर्यंत वयाची सूट}
- इच्छुक उमेदवार खालील लिंक वर क्लिक करून याप्रमाणे आपापल्या भागात महिला व बालविकास विभाग अंतर्गत प्रकाशित झालेल्या जाहिरातीची माहिती घेऊ शकतात https://zplatur.gov.in/pdfs/ZP_CERCULAR/ICDS/Advertise/ICDS_ADD_11_02_2025.pdf
- आवश्यक पात्रता
ज्या नगरपरिषद/नगरपंचायत/नगरपालिका/नगरपरिषद/ग्रामपंचायत क्षेत्रात अंगणवाडी आहेत,अशा ठिकाणी जे महिला आहेत त्यांच्यासाठी या पदांवर नियुक्तीसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.अशा नगरपरिषद/नगरपंचायत/नगरपालिका/ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात रहिवासी असलेल्या उमेदवारांना या भरतीसाठी पात्र समजण्यात येईल.यासाठी स्थानिक रहिवासी असल्या संदर्भात शासनाने निश्चित केलेला पुरावा अर्जासह जोडणे आवश्यक करण्यात आलेला आहे.
आपल्या जिल्ह्यात किंवा तालुक्यात अंगणवाडी सेविका/सेविका/ मदतनीस पद भरतीसाठी प्रक्रिया सुरू झाली किंवा नाही याची माहिती घेण्यासाठी जवळच्या बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्या कार्यालयाला संपर्क साधू शकता
ऑफलाइन अर्ज पाठविण्यासाठी पत्ता : बालविकास प्रकल्प अधिकारी यांचे कार्यालय
असे नमूद करून ज्या जिल्ह्यात तालुक्यात वरील पदांची जाहिरात निघालेली आहे त्या भागांचा नाव ऑफलाइन पाठवीत असताना पत्त्यावर नमूद करावा.
https://zplatur.gov.in/pdfs/ZP_CERCULAR/ICDS/Advertise/ICDS_ADD_11_02_2025.pdf
नोकरी ग्रुप जॉईन करण्यासाठी : येथे क्लिक करा