Anant Ambani आणि Radhika Merchant प्री वेडिंग सेलेब्रेशन आऊट!
बॉलीवूड, हॉलिवूड आणि अनेक मोठ्या उद्योगपतींचा असणार समावेश.
रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष व आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा Anant Ambani आणि एन्कोर हेल्थकेअर चे सीईओ वीरेन मर्चंट यांची मुलगी Radhika Merchant 12 जुलै 2024 रोजी मुंबई लग्नबेडीत अडकणार आहे. हा विवाह भारतातील सर्वात मोठ्या विवाह पैकी एक असेल अशी अपेक्षा आहे.
त्यापूर्वी 1 ते 3 मार्च रोजी प्री-वेडिंग सेलिब्रेशन होणार आहे. गुजरात मधील जामनगर मध्ये अंबानी कुटुंब या कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाआधीच्या सेलिब्रेशनचे भव्य डिजिटल आमंत्रण जागतिक सेलिब्रिटींशिवाय जवळचे मित्र आणि कुटुंबीयांना पाठवण्यात आले आहे. आमंत्रणा सोबत नऊ पानाचे सजावटीचे कार्ड मिळाले आहे, ज्यामध्ये कार्यक्रमाचा संपूर्ण तपशील ते कार्यक्रमाच्या ड्रेस कोड पर्यंतची संपूर्ण माहिती त्यात दिलेली आहे.
चला तर जाणून घेऊया.
अंबानी कुटुंबाचा तीन दिवसीय ग्रँड सेलिब्रेशन थीम!
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाआधीच्या मेगा इव्हेंट च्या मागे असलेल्या हॉस्पिट्यालिटी टीम ने तीन दिवसाच्या कार्यक्रमाचे तपशील शेअर केले आहे. पहिल्या दिवशी पाहुण्यांसाठी “एन इव्हनिंग इन अवर लँड” म्हणून डब केलेली कॉकटेल पार्टी असेल ज्याचा ड्रेस कोड शोभिवंत कॉकटेल आऊटफिट आहे. दुसऱ्या दिवशी पाहुण्यांना “अ वॉल्क ऑन द वाईल्ड साईड” साठी नेण्यात येईल आणि साजेसे कपडे आणि शूज घालण्याचा सल्ला दिला जाईल.
संध्याकाळी पाहुणे “मेला रूज” मध्ये सहभागी होणार आहे जेथे त्यांच्याकडून पारंपारिक भारतीय पोशाख परिधान करणे अपेक्षित आहे. शेवटच्या दिवशी तीन मार्चला “हस्ताक्षर” थीम ठेवून पाहुणे भारतीय संस्कृतीचा वारसा साजरा करताना दिसतील.
अनंत अंबानी-राधिका मर्चंट प्री-वेडिंग पाहुण्यांची यादी.
सुमारे 1,000 पाहुणे जोडप्याच्या लग्नाआधीच्या सोहळ्याला उपस्थित राहतील. यामध्ये मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स आणि मेलिंडा गेट्स, मेटा सीईओ मार्क झुकरबर्ग, ॲडोबचे सीईओ शांतनु नारायण, अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई आणि वॉल्ट डिज्नीचे सीईओ बॉब इगर यांच्यासह विविध क्षेत्रातील व्यक्तींचा समावेश आहे.
अदानी समूहाचे संस्थापक गौतम अदानी, आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला, विप्रोचे अध्यक्ष ऋषद प्रेमजी, झेरोधाचे सह-संस्थापक निखिल कामथ आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पूनावाला यासारखे भारतीय उद्योगपती देखील पाहुण्यांच्या यादीत आहेत. बिझनेस टायकून आणि वरिष्ठ अधिकारी यांच्या व्यतिरिक्त, अमिताभ बच्चन, रजनीकांत, शाहरुख खान, अनिल कपूर आणि आमिर खान यांच्यासह बॉलीवूड आणि दक्षिण भारतीय सुपरस्टार देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे.
यशराज फिल्म्सचे प्रमुख आदित्य चोप्रा आणि त्यांची पत्नी राणी मुखर्जीही या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. भारतीय क्रिकेटचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर जामनगरमधील उत्सवात सहभागी होणार आहे. पाहुण्यांच्या यादीतील इतर क्रिकेटपटूंमध्ये रोहित शर्मा, एमएस धोनी, हार्दिक आणि कृणाल पांड्या, केएल राहुल आणि इशान किशन यांचा समावेश आहे.
तर पाहुण्यांसाठी विशेष उड्डाने आयोजित केली जातील का?
पाहुण्यांसाठी मुंबई / दिल्ली ते जामनगर एक मार्च रोजी सकाळी 7 ते दुपारी 1 वाजताच्या दरम्यान फ्लाईट आयोजित करण्यात येत आहे. जामनगर मध्ये राहण्याची आणि वाहतुकीची व्यवस्था देखील केली जाणार आहे. पाहुण्यांना त्यांच्या तिकिटांसोबत फ्लाईट आणि लॉजिस्टिकची सर्व माहिती प्रदान केली जाईल.
फ्लाईट मध्ये एका पाहुण्या जोडप्याला किती सामानाची परवानगी असेल?
प्रत्येकाचे सामान सामावून घेण्यासाठी अंबानींकडून चार्टर फ्लाईट साठी जाणीवपूर्वक पॅकिंग करण्यास सांगितले जाईल. ज्यामध्ये प्रत्येक व्यक्तीसाठी एक सामान ठेवण्याचा कप्पा किंवा प्रत्येक जोडप्याला तीन सुटकेस ठेवण्याइतकी जागा देण्यात येणार आहे.
राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी ची कशी जुळली रेशीमगाठ?
अनंत अंबानी हे रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्षा नीता अंबानी यांचे धाकटे पुत्र आहेत. राधिका ही एन्कोर हेल्थकेअरचे सीईओ वीरेन मर्चंट आणि उद्योजिका शैला मर्चंट यांची धाकटी मुलगी आहे. बालपणीचे मित्र असलेले अनंत आणि राधिका डिसेंबर 2022 मध्ये राजस्थानमधील नाथद्वारा येथील श्रीनाथजी मंदिरात पारंपारिक लग्न जुळवण्यात आले.आणि त्यांचा गोल धना समारंभ म्हणजेच साक्षगंधाच्या कार्यक्रम 19 जानेवारी 2023 रोजी साजरा करण्यात आला होता.
अंबानी कुटुंबाने जामनगरच हे ठिकाण का निवडले?
मी तुझ्याशी बोलताना यावर अनंत अंबानींनी उत्तर देताना म्हटले की, “माझी आजी जामनगरची आहे. माझ्या आईने संपूर्ण शहर वसवले आहे. त्यांनी संपूर्ण गोष्ट विटांनी बांधली आहे. मी लहानपणी खूप वेळ इथे घालवला आहे. मुंबई माझे घर आहे, पण माझे हृदय जामनगरमध्ये आहे. माझ्या आई-वडिलांनी आणि आजींनीही जामनगर निवडावे असे सुचवले. त्यामुळे मला माझ्या सहकाऱ्यांसोबत आणि मी काम करत असलेल्या इतर लोकांसोबत कार्यक्रम सेलिब्रेट करण्याची संधी मिळणार आहे.”
अंबानींच्या कार्यक्रमाचा भोजन मेन्यू काय असणार?
मुलाच्या लग्नाआधीच्या सेलिब्रेशनसाठी जामनगरमध्ये आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमासाठी इंदूरमधील 65 शेफ ना आमंत्रित करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात पारसी खाद्यपदार्थांसह थाई, मेक्सिकन, जपानी, पॅन आशियाई खाद्यपदार्थ तयार केले जातील. दररोज दुपारच्या जेवणात 225 पेक्षा जास्त पदार्थ.
रात्रीच्या जेवणात 275 प्रकारचे पदार्थ, नाश्त्यात 75 प्रकारचे पदार्थ आणि मध्यरात्रीच्या जेवणात 85 प्रकारच्या पदार्थांचा समावेश असणार आहे. मध्यरात्रीचे जेवण मध्यरात्री 12 ते पहाटे 4 वाजेपर्यंत दिले जाईल, इतर कार्यक्रमांमध्ये एकाही पदार्थाची पुनरावृत्ती होणार नाही. अशा पद्धतीने तयारी करण्यात आली आहे.