Amravati Airport : अमरावती विमानतळावरून लवकरच विमाने उड्डाण भरणार! अमरावती-मुंबई हवाई सफर झाला सुलभ !

Amravati Airport : विमानतळासंदर्भात विदर्भात मोठी बातमी समोर आलेली आहे.नागपूरच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाव्यतिरिक्त विदर्भात चांगल्या दर्जाचे एअरपोर्ट नसल्याने विदर्भकर जनतेला नागपूर किंवा इतर मोठ्या शहराकडे वळून विमान प्रवास करावा लागतो,मात्र आता विदर्भात अमरावती  शहरात सुद्धा उच्च दर्जाचा विमानतळ येणाऱ्या एका महिन्यात सुरू होणार आहे,या विमानतळावरून अमरावती ते मुंबई नियमित हवाई सफर आणि हवाई वाहतूक सेवा सुरू होणार आहे.

{Amravati Airport}अमरावती नजीक 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या बेलोरा येथे विमानतळाचे काम पूर्ण झाले आहे.लवकरच येथून अमरावतीकर मुंबईसाठी विमानातून उड्डाण भरू  शकणार आहे.गेल्या अनेक वर्षापासून अमरावतीमध्ये राष्ट्रीय दर्जाचा विमानतळ असावा हा स्वपन  आता प्रत्यक्ष साकार होताना दिसत आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

येथे व्यवसायिक विमान उडाणे सुरू होण्यासाठी आता फक्त DGCA च्या परवानगीची वाट पहिली जात आहे.कारण अमरावती विमानतळ सुरू करण्यासाठी सर्व प्रकारचे डेव्हलपमेंट आणि मूलभूत सुविधा उपलब्ध झाले असून विमानांची उडाणे आणि लँडिंग साठी कॅलिब्रेशन चाचणी प्रक्रिया सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आलेली आहे.

मागील अनेक महिन्यापासून अमरावती विमानतळ लवकर सुरू होणार असल्याची चर्चा सुरू होती.आता या विमानतळाचे काम पूर्णत्वाच्या दिशेने आले आहे.जवळपास अमरावती विमानतळ विमानांच्या उडाणासाठी तयार आहे.आता एका महिन्यानंतर या विमानतळावरून पहिला प्रवासी व्यवसायिक विमान गगन भरारी घेणार असल्याची शक्यता आहे.

नुकतेच अमरावती विमानतळासाठी कॅलिब्रेशन ऑफ प्रिसिजन पाथ इंडिकेटर{PAPI} चाचणीयशस्वीरित्या पूर्ण करण्यात आलेली आहे.यामुळे आता अमरावती शहर आणि जिल्हावासीयांना अमरावती ते मुंबई पर्यंत विमानाने प्रवास करण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे.राज्य विमानतळ डेव्हलपमेंट आणि विमानसेवा प्राधिकरणद्वारे येथे विमानतळाची सर्व कामे करण्यात आली असून आता,डायरेक्टर जनरल सिविल एव्हिएशन{DGCA} यांची अमरावती विमानतळावरून कमर्शियल विमानांचे नियमित उडाने सुरू करण्यासाठी परवानगी  मागण्यात आलेली आहे.

ती मिळताच या विमानतळावरून नियमितपणे अमरावती मुंबई विमानसेवा सुरू होणार आहे.उल्लेखनीय म्हणजे अमरावती जिल्ह्यात हा पहिला विमानतळ सुरू झाल्यावर या मागास जिल्ह्यात उद्योगधंदे आणि विविध रोजगारांच्या संधी निर्माण होणार.याचे कारण म्हणजे अमरावती विमानतळावरून प्रवासी विमान  उडानांसह विविध प्रकारचे मालवाहू विमान सुद्धा या विमानतळावर उतरणार अशी शक्यता आहे,त्यामुळे या भागात उद्योग व्यवसाय आणि रोजगारांचा विस्तार होईल .

Amravati Airport : अमरावतीचे विमानतळ बेलोरा मध्ये.

अमरावती जिल्ह्यातील विमानतळ हे अमरावती शहरानजीक 15 किलोमीटरवर असलेल्या बेलोरा जवळ निर्माण झाला आहे.त्यामुळे याला सध्या बेलोरा विमानतळ म्हणून सध्या ओळखले जात आहे,याचे नामकरणही लवकर होणार असल्याची शक्यता आहे.

अमरावती शहराच्या दक्षिण भागात शहरापासून अगदी 15 किलोमीटर अंतरावर बेलोरा येथे हा विमानतळ उभारण्यात आलेला असून महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी{MADC} द्वारे या विमानतळाला डेव्हलप करण्यात आले आहे.

लवकरच अमरावती शहराचा हा विमानतळ पूर्ण क्षमतेने कार्यरत झाल्यावर विदर्भात आता नागपूर आणि गोंदिया पाठोपाठ अमरावतीचे हे तिसरे व्यावसायिक वापरासाठी सुरु होणारे विमानतळ असेल.

अमरावती Airport विमान उड्डाणांसाठी .

  • अमरावती विमानतळ हे 389 हेक्टर क्षेत्रफळावर विकसित करण्यात आला आहे.
  • विमानतळावर विशेष असा एअर ट्रॅफिक कंट्रोल{ATC} डिपार्टमेंट, आधुनिक संचलन यंत्रणा,विमानतळ टर्मिनल बिल्डिंग,विमानतळावरील एयरस्ट्रीपचे काम पूर्ण झालेले आहे.
  • या विमानतळावरील धावपट्टी एकूण1850 मीटर लांबीची असून त्याची रुंदी 45 मीटर इतकी आहे.
  • या विमानतळावर आकर्षक अशी एअरपोर्ट टर्मिनसची इमारत सुद्धा निर्माण झाली असून याला 2600 स्क्वेअर फुट मध्ये निर्माण करण्यात आले आहे.
  • विमानतळावर 163 बाय 18 मीटर आकाराचा आणि 100 बाय 18 मीटर एप्रन असलेला टॅक्सी वे विमानतळावर प्रवाशांची आणि इतर कामांसाठी ने आण करण्यासाठी उपयोगाचा ठरेल.

विमानतळावर  कॅलिब्रेशन चाचणी यशस्वीरित्या पूर्ण.

अमरावती नजिक बेलोरा विमानतळाची नुकतेच कॅलिब्रेशन चाचणी यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली आहे. महाराष्ट्र एविएशन डेवलपमेंट कंपनी{MADC} कडूनही चाचणी घेण्यात आली असून,ही चाचणी प्रणाली विमानतळावर प्रामुख्याने  विमानाच्या उड्डाण आणि लँडिंग दरम्यान पायलटला मार्गदर्शन करण्यासाठी वापरात येते.

ही चाचणी आता यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याने या विमानतळावर 72 आसनी विमानांचे उड्डाण आणि लँडिंग शक्य झाले आहे.या विमानतळावर विशेष असा एअर ट्रॅफिक कंट्रोल{ATC} डिपार्टमेंट, त्याची आधुनिक संचलन यंत्रणा,विमानतळ टर्मिनल बिल्डिंग आणि एकूणच विमानतळावरील एयरस्ट्रीपचे काम पूर्ण झालेले आहे.

डायरेक्टर जनरल सिविल एव्हिएशन  करून परवानगीची प्रतीक्षा.

अमरावती येथील या विमानतळाचे संपूर्ण काम झाले असून येथे विमानांच्या मुलांना आणि लँडिंग साठी सर्व प्रकारच्या चाचण्याही पूर्ण करण्यात आले असून,आता फक्त येथून नियमित प्रवासी विमान वाहतूक सेवा सुरू करण्यासाठी डायरेक्टर जनरल सिविल एव्हिएशन {DGCA} करून परवानगी मिळणार आहे,ही परवानगी मिळताच  येथून नियमित अमरावती – मुंबई प्रवासी विमानसेवा सुरू होईल.

यासाठी अमरावती विमानतळ प्रशासनाकडून यासाठी DGCA कडे नियमानुसार अर्ज करण्यात आलेला आहे.परवानगीचे हे काम येत्या एका महिन्यात पूर्ण होण्याची शक्यता सुद्धा आहे,त्यामुळे पुढील काही दिवसातच अमरावती येथून  विविध कंपन्यांचे विमान सेवा या विमानतळावरून सुरू होईल.या विमानतळामुळे अमरावती जिल्हा आणि शहरातील आसपासच्या भागात आर्थिक विकास साधने शक्य होईल.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

two − 2 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.