बाळापूर वि.स.मतदार संघ.राष्ट्र.काँ.पक्षाचा उमेदवार विजयी होणार! आ. Amol Mitkari-यांचे प्रतिपादन.
*बाळापुर जिल्हा अकोला प्रतिनिधी:-जाकीर अहमद*
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुका बाळापूर ग्रीमनारखेड येथील नामफलक सोहळा व जाहीर सभेत लक्षणीय उपस्थिती.
संदिप पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये घर वापसी केली तेव्हापासून तालुक्यात व जि.पक्ष बळकटीसाठी मोलाची साथ मिळाली असे प्रतिपादन विधानपरिषद सदस्य आमदार Amol Mitkari यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गाव तेथे शाखा ही राज्याचे उप मुख्यमंत्री ना अजित दादा पवार यांची संकल्पना घेऊन ग्रामशाखा स्थापन करण्याचे कार्य अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील मनारखेड येथून सुरुवात केली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नामफलक सोहळा पार पडला.सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज,डॉ बाबासाहेब आंबेडकर,पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन, व हार अर्पण आमदार अमोल मिटकरी,संदीप पाटील यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर ज्ञानेश्वर लोड यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर संदीप पाटील यांनी आपले विचार व्यक्त केलं.
त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांनी आपल्या भारदस्त शैलीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा मांडली आणि येणाऱ्या 2024 च्या लोकसभेमध्ये जो कुणी उमेदवार जाहीर होईल त्यांचे युतिधर्म पाळत प्रामाणिक काम केले जाईल असे आश्वासन दिले त्यानंतर गेल्या अनेक वर्षांपासून बाळापूर मतदार संघामध्ये कुठल्याही प्रकारची विकासात्मक कामे होताना दिसत नाहीत जनतेचे फक्त दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे.
इथ निवडून येणारे लोकप्रतिनिधी काय करतात असा प्रश्न या वेळी उपस्थित केले दोन्ही तालुक्याचा मी दौरा केला परंतु मला कुठेही जनतेच्या हितासाठी केलेले काम पाहायला मिळाले नाहीत ही शोकांतिका आह बाळापूर सारखे एतीहासिक वारसा लाभलेले शहर विकासापासून कोसो दूर आहे,रस्त्यांची परिस्थितीत बिकट आहे,रोजगारासाठी कुठल्याही प्रकारचे उद्योग नाहीत.
जनसामान्य लोकांनसाठी कुठल्याही योजनांची अंमलबजावणी होत नाही आहे .शेतकऱ्याच्या समस्या जशाच तशा आहेत ,जर अश्याच प्रकारच्या निष्क्रिय लोकांना आपण निवडून दिले तर कुठेही विकास होणार नाही ,जर बाळापूर मतदार संघाचा विकास करायचा असेल , लोकांना न्याय मिळवून द्यायचा असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा तरुण तदफदार संदीप पाटील यांना निवडून देणे गरजेचे आहे.
या मतदार संघामध्ये कुठल्याही विकास कामासाठी निधी कमी पडू देणार नाही.असे प्रतिपादन आमदार अमोल मिटकरी यांनी केले आहे यावेळी कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून दीपक पोहरे,विठ्ठल नळकांडे,धनंजय माळी,वसीम शेख,विष्णू अरबट,विनोद पाटील,अमोल ठाकरे,संतोष लांडे,प्रमोद पाटील,स्वप्नील थोरात,शुभम शिरसाट,तथा शाखेचे प्रमुख सचिन सुरुशे,सतीश सपकाळ,महिला शाखा प्रमुख मंगलाताई वाळे,शशी उबाळे,दादू पांडे,भावराव हिवरळे सोपान राऊत, प्रमोद लांडे , कांशीराम लांडे यांचे सह पंचक्रोशीतील हजारो कार्यरते,पदाधिकारी तसेच मनारखेड ग्रामस्थ बहु संख्येने उपस्थित होते.