Amit Thakre MNS : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्यासाठी भाजप आपल्या मदतीचे दार उघडले आहे.यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत माहीम मतदारसंघातून पराभूत झाल्यानंतर ही अमित ठाकरे हे आता भाजपच्या मदतीने विधान परिषदेत आमदार म्हणून पोहोचणार आहे.
या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन आम्ही ठाकरे यांना विधान परिषदेत आमदार म्हणून पाठविण्यासाठी ऑफर दिल्याची राजकीय चर्चा सुरू आहे.
भाजपच्या राज्यपाल कोट्यातून अमित ठाकरे विधान परिषदेत पोहोचणार?
महानगरपालिका आणि राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र निर्माण सेना मनसे आणि भाजप यांची युती होणार असल्याचे या माध्यमातून राजकीय संकेत मिळाले आहे. या पार्श्वभूमीवर एकूणच मुख्यमंत्री फडणवीस आणि मनचे अध्यक्ष ठाकरे यांची मुंबईत यासंदर्भात झालेली ही भेट महत्त्वाचीही मानली जात आहे.
या युतीपूर्वी भाजपने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना एक महत्त्वाची ऑफर दिली असल्याची राजकीय चर्चा सुरू आहे.ती म्हणजे राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना भाजप आपली मदत देऊन भाजपच्या राज्यपाल कोट्यातून त्यांना विधान परिषदेत आमदार पदी नियुक्त करणार आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राज ठाकरे यांच्यासोबत ही पहिली राजकीय भेट मानली जात आहे .मात्र या भेटीनंतर राज्यातील राजकारण ढवळून निघताना दिसत आहे.
कारण राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे.या पार्श्वभूमीवर फडणवीस आणि ठाकरे यांची भेट महायुतीत तीन पक्ष आणि त्यात निवडणूक स्वबळावर लढण्याची भाषा सुरू असताना CM फडणवीस – मनसे प्रमुख राज ठाकरे यांची बंदद्वार भेट महत्त्वाची मानली जात आहे.एकूणच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप आणि मनसे युती होणार असल्याचे हे मजबूत संकेत असल्याचे राजकीय क्षेत्रात बोलले जात आहे.
Amit Thakre MNS : अमित ठाकरे यांना आमदारकीसाठी मनसे भाजप युती?
उल्लेखनीय म्हणजे महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची महायुती संदर्भात सकारात्मक भूमिका समोर आली होती.
आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप आणि मनसेची युती होणार अशी चर्चा होत असतानाच, मुख्यमंत्री फडणवीस आणि मनसे अध्यक्ष ठाकरे यांची भेट झाल्यानंतर जी माहिती समोर आली,ती म्हणजे भाजप आपल्या राज्यपाल कोट्यातून अमित ठाकरे यांना आमदारकी पदी नियुक्त करेल. त्यामुळे मनसे आणि भाजप युती आता का होणार आहे याचे प्रमुख कारण या भेटीमुळे समोर आले आहे.
विशेष म्हणजे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अमित ठाकरे पहिल्यांदा माहीम मतदारसंघातून मनसेकडून निवडणूक लढले होते,मात्र यात त्यांचा पराभव झाला होता,आता अमितना राज ठाकरे यांना विधान परिषदेत पाठवायचे आहे का ? ही बाब तपासण्यासाठी आणि त्यांना आमदार पदी नियुक्त करण्यासाठी भाजपचा कोटा राज्यपालांकडे मोठा असल्याने ऍडजस्ट करण्यासाठी ही ऑफर मनसे ने समोर केली की,भाजपने हे सध्या उघड झाले नाही,मात्र अमितना विधानपरिषदेत पाठविण्यासाठी ही युतीची ऑफर महत्वाची आहे.त्यामुळेच लवकरच अमित ठाकरे हे भाजपच्या राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेत आमदार म्हणून पोहोचणार आहेत अशी पुरेपूर शक्यता आहे.
भाजपचे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकपूर्वी महायुतीमध्ये दबाव तंत्र तर नाही ना?
उल्लेखनीय म्हणजे विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदा मनस अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेऊन निवडणुकीचे विश्लेषण करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष केले होते,यानंतर अजित पवार यांनी राज ठाकरे यांना जोरदार प्रत्युत्तर दिले.
मात्र विधान परिषदेत महायुती मधून तीन पक्षातील एकूण संख्या बळावर राज्यपाल कोट्यातून आमदार निवडण्यासाठी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये निवडणूक लढवण्यास अंतर्गत कुजबूज सुरू असल्याची चर्चा आहे.
यामुळेच रविवारी भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी अजित पवार यांना महायुतीत असताना राजकीय सल्ला दिला.यामुळे महायुतीमध्ये बिघाड येत असल्याचे राजकीय संकेत मिळत असताना लगेच दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली,यामुळे महायुतीमध्ये राजकीय उलटपालट होऊन भाजप स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपला वर्चस्व ठेवण्यासाठी मनसेची साथ घेण्यासाठी तत्पर असल्याचे संकेत मिळाली आहे.
आणि यातूनच या दोन्ही नेत्यांमध्ये दीर्घ चर्चा झाली आणि यावेळी मनसेचे अनेक वरिष्ठ पदाधिकारीही हजर होते. त्यामुळे भाजप मनसे युतीवर बंदद्वार चर्चा होऊन राज ठाकरे यांना भाजप राज्यपाल कोट्यातून विधानपरिषदेत पाठविण्यासाठी शिक्कामोर्तब झाल्याचे विश्वसनिय वृत्त समोर आले.