Amber Nugget : आयुष्यभर आजीबाई ज्याला दरवाज्याचा अडसर समजल्या,तो दगड निघाला तब्बल ९ कोटींचा ! मृत्यूनंतर कळली किंमत!!

Amber Nugget : आयुष्यभर आजीबाई ज्याला दरवाज्याचा अडसर समजल्या,तो दगड निघाला तब्बल ९ कोटींचा ! मृत्यूनंतर कळली किंमत!!

Amber nugget : आजीबाईच्या दरवाज्यात होता कोट्यावधींचा “अंबर दगड”.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

रोमानिया देशात राहणाऱ्या एका वृद्ध आजीबाईंच्या आयुष्यात आपल्या घरात पडून असलेला दगड किती किमती आहे त्याची किमया काय असू शकते याची किंमत कधी कळु शकली नाही. घरात दरवाज्याला अडसर म्हणून हे वृद्ध महिला ज्या दगडाला जीवन पर्यंत सांभाळत आली तो त्याच्या मृत्यूनंतर कोट्यावधींची रुपये किमतीचा अंबर दगड असल्याचे वास्तव समोर आले. रोमानिया सरकारने जेव्हा या दगडाचे आकलन केले तेव्हा या अंबर दगडाची किंमत नऊ कोटी रुपये असल्याचे रहस्य समोर आले.
रोमानीयातील ही आजीबाई या अंबर दगडाला फक्त साधारण दगडाचा तुकडा असल्याचं समजून घराच्या उंबरठ्यावर ठेवत होती.विशेष म्हणजे या वृद्ध महिलेच्या  घरी एकदा चोरी सुद्धा झाली, मात्र तिच्या घरी पडून असलेला कोट्यावधींचा हा अंबर दगड चोरांच्या लक्षात सुद्धा आला नाही, ते चोर सुद्धा आजीबाई सारखेच या किमती रत्नाची पारख करु शकले नव्हते.त्यामुळे त्यांनी फक्त आजीबाईचे सोन्याचे दागिने चोरुन नेले.आपल्या देशात एक म्हण आहे की सोन्या चांदी आणि हिऱ्यांची खरी ओळख ही फक्त पारखी सोनारालाच कळते. आणि रोमानिया येथे ही म्हण खरी ठरली आहे.कारण आजीने ज्याला दगड समजून दरवाजा रोखण्यासाठी वापरले.ते मात्र मुळात जगात सर्वात जास्त किंमत असलेला बहुमूल्य अंबर धातू निघालं.

अशी ही अंबर दगडाची वास्तविक कहाणी.

जगासमोर ही महत्वपूर्ण माहिती रोमानिया सरकार आणि स्पेन मधील स्पेनिश भाषेतील वृत्तपत्र एल पाईस’ने समोर आणली. या माहितीनुसार या वृद्ध महिलेच्या घरी त्याच्या मृत्यूनंतर आढळलेला या अंबर धातूच्या या दगडाची अर्थातच बहुमूल्य रत्नाची किंमत 1.1 डॉलर म्हणजे साधारण भारताच्या करन्सी मध्ये गणना केल्यास 9 कोटी 13 लाख रुपयांमध्ये आहे.

रोमानिया मध्ये कोल्टि गावात आपल्या कुटुंबासह ही वृद्ध महिला राहत होती घराची मुखिया म्हणून ती कुटुंबाची प्रमुख व्यक्ती होती.या वृद्ध महिलेला हा अंबर दगडाचा तुकडा कोल्टी गावाजवळ वाहणाऱ्या नदीच्या नदी किनाऱ्यापाशी मिळाला होता. काहीसा पिवळा,चमकीले  असलेला हा दगड तिने आपल्या घरात आणला होता.कधी ती दरवाजाचा अडसर म्हणून त्याला वापरत होती.कधी ती या दगडाला  घराच्या उंबरठ्यावरही ठेवत होती.पण या अंबर धातूचा असलेल्या बहुमूल्य किंमत या वृद्ध महिलेल्या मृत्यूनंतर समोर आली.तिच्या मृत्यूनंतर झाले असे की,तिच्या एका नातेवाईकाची नजर घराचा दरवाजा रोखणाऱ्या त्या दगडाच्या तुकड्यावर पडली. त्याला हा दगड आकर्षक वाटल्याने थोडा संशय आला. मग त्याने खात्री केल्यानंतर कळाले की, हा बहुमूल्य अंबर धातू आहे.त्या नातेवाईकाने हा अंबर दगड नंतर आपल्या रोमानिया सरकारला विकून कोट्यावधींचे डॉलर प्राप्त केले.

रोमानिया ने केले राष्ट्रीय खजाना घोषित.

रोमानिया सरकारने हे अंबर राष्ट्रीय खजाना म्हणून घोषित  करीत त्यापूर्वी त्याची तपासणीसाठी पोलंड येथील क्राकोव इतिहास संग्रहालयात या दगडाला पाठवलं.पोलंडच्या तज्ज्ञांनी या तुकड्याचा सखोल अभ्यास करुन हे अंबर ३८.५ ते ७० मिलियन वर्षे जुना असल्याचं स्पष्ट केले.मग रोमानिया सरकारने याला बुजाऊच्या विभागीय संग्रहालयात ठेवले.याचे संचालक डेनियल कोस्टाचे यांच्यानुसार, हा अंबराचा तुकडा वैज्ञानिक आणि संग्रहालय या दोन्ही पातळ्यांवर अत्यंत मौल्यवान तसेच जगातील अंबर दगडात सगळ्यात मोठ्या तुकड्यांपैकी एक आहे.

काय असते अंबर.

अंबर दगड ज्याला अंग्रेजीत एम्बर स्टोन देखील म्हणतात,तो पाईन वृक्षातून निघालेली राळ असते.हजारो वर्ष जमिनीवर पडून राहून ती जीवाश्मचे रुप घेते.शतकानुशतके दागिने तसेच सजावटीच्या वस्तू आणि औषधांमध्ये हा किमती धातू वापरला जात आहे. हा एक अर्धपारदर्शक, पिवळा-नारिंगी रत्न आहे.जंगलात दगड स्वरूपात पडलेल्या किंवा हजारो वर्षांपूर्वीपासून जमिनीत दबलेले असे अंबर दगड ज्यात प्राचीन वनस्पती सामग्री, कीटक किंवा अगदी लहान प्राणी देखील असू शकतात.
जेव्हा पाइन झाडाची राळ सालातून वाहते आणि कडक होते, पाने, बिया किंवा किडे यांसारख्या ढिगाऱ्यांना अडकवतात तेव्हा अंबर तयार होतो. कालांतराने ही राळ जीवाश्म बनून जाते.अंबरला त्याचे सौंदर्य, दुर्मिळता आणि ऐतिहासिक महत्त्व यामुळे मानले जाते. पेंडेंट, अंगठ्या आणि इतर दागिन्यांमध्ये हा धातू वापरले जाते.  तसेच अख्या जगात पारंपारिक औषधांमध्ये त्याच्या वापर होऊन उपचार गुणधर्मांसाठी विशेष महत्व असते.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

three + 16 =