लोहारागावात भर उन्हाळ्यात पाणीटंचाई.
*प्रतिनिधी:–जाकिर अहमद बाळापूर जिल्हा अकोला*
२०० लिटर पाण्याठी मोजावे लागतात ५० रुपये.
बाळापूर जिल्हा अकोला:- दरवर्षीचा उन्हाळा हा महाराष्ट्रात पाणीटंचाईचा काळ असतो. यावर्षीही राज्यात पाणीटंचाई आहे, पण ती निव्वळ उन्हाळ्यामुळे नाही तर अकोला प्रशासन सुस्त असल्यामुळे आहे.कारण लोहारा येथील मन नदीवरील कवठा बाॅरेज मागील कित्येक वर्षांपासून बांधुन ठेवले आहे. परंतु त्या धरणात पाणीच अडविले नाही. याचे कारण लोहारा मन नदीवरील नवीन पुला चे बांधकाम मागील कित्येक वर्षांपासून कासव गतीने चालु आहे.
अकोला प्रशासनाला यांचे काही देणे घेणे नसल्याचे समजते कारण अकोला प्रशासन सुस्त व येथील नागरिक ञस्त आहे. आज लोहारा गावातील नागरिकांच्या हाताला उन्हाळ्यात काम नसल्यामुळे येथील नागरिकांना २०० लिटर पाण्याठी ५० रुपये मोजावे लागतात तर दरोज ५० रुपये आणावे कुठून हा प्रश्न येथील गरीब नागरिकांना पडतो. पाणीटंचाईला जबाबदार येथील गैरप्रशासन, पाणीटंचाईची कारणे आहेत. राज्याच्या विविध भागातील पाणीटंचाईची स्थिती आणि त्यावर करण्यात येणारे उपाय हे अकोला प्रशासन करित नसल्यामुळे आज लोहारा गावांतील नागरिकांना पाणीटंचाईला समोर जावे लागत आहे।