पोलीस स्टेशन खदान अकोला हदित देशी पिस्टल व ०५ जिवंत काडतुसासह आरोपी जेरबंद.

*अकोला प्रतिनिधि गुलाम मोहसिन*

अकोला शहरातील पोलीस स्टेशन खदान अकोलाचे हदिदत आज दि. ०५.०४.२०२४ रोजी पो. निरी, धनंजय सायरे हे पो.स्टे.च्या डि.बी. पथकासह लोकसभा निवडणुक संबंधाने पेट्रोलींग करीत असतांना त्यांना गुप्त बातमीदारा कडुन बातमी मिळाली की, एक इसम हा हिंगणा फाटा परिसरा मध्ये मोटार सायकलने गावठी पिस्टल व जिवंत काडतुस जवळ बाळगुन संशयास्पदरित्या फिरत आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

अशा गुप्त माहिती वरून सदरची माहिती मा. वरिष्ठांना देवून पो.नि. धनंजय सायरे व सोबत डि.बी. पथकाचे कर्मचारी यांनी घटनास्थळी जावून नमुद इसमाचा शोध घेतला असता एक इसम हा हिंगणा फाटा येथे संशयास्पदरित्या मोटार सायकलने फिरत असतांना दिसुन आल्याने त्यांस पो. स्टाफचे मदतीने थांबवुन त्यांस त्यांचे नांव विचारले असता त्याने त्याचे नांव मिर्झा इमरान बेग मिर्झा सलिम बेग वय ३३ वर्ष रा. शबनमनगर खैरमोहम्मद प्लॉट अकोला असे सांगीतले वरून त्याचे मोटार सायकलला असलेल्या नायलॉन थैलीची पंचासमक्ष पाहणी केली.

असता सदर थैली मध्ये एक देशी पिस्टल (अग्णीशस्त्र) मॅगझीनसह किंमत ३०,०००/-रु. व सोबत ०५ जिवंत काडतुस किं. ५०००/-रू. अवैद्यरित्या जवळ बाळगतांना मिळुन आला व त्याचे ताब्यातील मोटार सायकल कं. एमएच-३०-बिजी-७३२२ किं. अं. ७०,०००/-रू. असा एकुण १,०५,०००/-रू. असा मुददेमाल मिळून आल्याने सदरचा मुददेमाल पंचासमक्ष जप्त करून आरोपी विरूध्द पो.स्टे. खदान अकोला येथे अप.नं. ३१६/२०२४ कलम ३, २५ आर्म अॅक्ट प्रमाणे गुन्हां नोंद करून आरोपीस वि. न्यायालया समक्ष हजर केले असता वि.

न्यायालयाने आरोपीचा ०१ दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केला आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक श्री. अभय डोंगरे तसेंच उप-विभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग अकोला श्री. सतिष कुळकर्णी, पो.स्टे. खदान येथील पोलीस निरीक्षक धनंजय सायरे, पो. हवा./विजय चव्हाण, नितीन मगर, संजय वानखडे, पो.शि. रोहित पवार यांनी केली आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

15 − four =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.