स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई.

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई.

*प्रतिनिधी राहुल सोनोने ( मळसूर)*

पातुर : स्थानिक गुन्हे शाखा, अकोला यांचे आचार संहिता काळातील गावठी हातभट्टी दारूच्या जिल्हयात वेगवेगळ्या ठिकाणी ०४ मोठ्या कारवाई एकुण २,५५,४७०/ रू चा मुद्देमाल जप्त. आगामी येणा-या लोकसभा निवडणुक २०२४ व्या अनुषंगाने मा. पोलीस अधिक्षक अकोला श्री. बच्चन सिंह सा.
यांनी अकोला जिल्हयातील अवैध दारू विक्री करणारे तसेच गावठी हातभ‌ट्टीवर दारू तयार करून विक्री करणा-यां आरोपीतांविरुध्द कारवाई करणे करिता स्था.गु. शा. अकोला येथील अधिकारी व अंमलदार यांचे पथके गठीत करून त्याबाबतची माहिती घेवुन कारवाई करणे करिता आदेशीत केले.

असता स्था. गु.शा. अकोला येथील पथकांनी गुप्त माहितीवरून खालील प्रमाणे कारवाई केल्या दिनांक १२/०४/२०२४ रोजी पो.स्टे. उरळ हद्दीमध्ये ग्राम मोरगाव सादिजन येथे छापा कारवाई केली असता आरोपी A नामे गजानन महादेव सोळंके वय ४० वर्ष रा. मोरगाव सादिजन ता. बाळापुर जि. अकोला याचे जवळुन ८० लिटर गावठी हातभ‌ट्टीची दारू व सडवा मोहगाव ३९० लिटर व ईतर साहित्य असा एकुण ४७,०००/रु चा मु‌द्देमाल जप्त करून आरोपी मु‌द्देमालसह पुढील कायदेशीर कारवाई कामी पो. स्टे. उरळ यांचे ताब्यात देण्यात आले.

दिनांक १३/०४/२०२४ रोजी पो.स्टे. चान्नी हद्दीमध्ये ग्राम सस्ती शिवार निर्गुळा नदी पात्र येथे छापा कारवाई केली असता आरोपी नामे नतीन मोतीराम अंभोरे वय ३० वर्ष रा. ग्राम सस्ती ता. पातुर जि. अकोला याचे जवळून ७५ लिटर गावठी हातभट्टीची दारू व सडवा मोहमाथ ४२० लिटर व ईतर साहित्य असा एकुण ४९,५००/रू वा मुद्देमाल जप्त करून आरोपी मु‌द्देमालसह पुढील कायदेशीर कारवाई कामी पो. स्टे. चान्नी यांचे ताब्यात देण्यात आले.

दिनांक १३/०४/२०२४ रोजी पो.स्टे. बार्शिटाकळी ह‌द्दीमध्ये ग्राम टिटवा शेतशिवार येथे छापा कारवाई केली असता आरोपी नामे सुरेश बाळु शिंदे वय ३७ वर्ष रा. ग्राम टिटया ता बार्शिटाकळी जि. अकोला याचे जवळून १५ लिटर गावठी हातभ‌ट्टीची दारू व सडवा मोहमाय ७३५ लिटर व ईतर असा एकुण १,१३,५२०/रू वा मुद्देमाल जप्त करून आरोपी मु‌द्देमालसह पुढील कायदेशीर कारवाई कामी पो. स्टे. बार्शिटाकळी यांचे ताब्यात देण्यात आले.

दिनांक १३/०४/२०२४ रोजी पो.स्टे. अकोट ग्रामीण हद्दीमध्ये ग्राम पोपटखेड जामुन नाला येथे छापा कारवाई केली असता आरोपी नामे गजानन शंकरलाल साल्फेकर वय ५० वर्ष रा. पोपटखेड ता. अकोट जि. अकोला याचे जवळुन १०० लिटर गावठी हातभट्टीची दारू व सडवा मोहमाच ५२५ लिटर व ईतर असा एकुण ४५,४५०/रू वा मुद्देमाल जप्त करून आरोपी मुद्देमालसह पुढील कायदेशीर कारवाई कामी पो.स्टे. अकोट ग्रामीण यांचे ताब्यात देण्यात आला. वरील ०४ कारवाईमध्ये एकुण ०४ आरोपीतांविरूध्द कारवाई करून त्यांवेजवळून एकुण २,५५,४७०/ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदरची कार्यवाही ही मा. पोलीस अधिक्षक श्री. बच्चन सिंह सा., मा. अपर पोलीस अधिक्षक श्री अभय डोंगरे सा, यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि शंकर शेळके, स्थानिक गुन्हे शाखा अकोला पो.उप. नि. गोपाल जाथव थ स्थानिक गुन्हे शाखा अकोला येथील पोलीस अंमलदार दशरथ बोरकर, प्रमोद ढोरे, उमेश पराये, गोकुळ चव्हाण, रवि खंडारे, सुलतान पठाण, महेद्र मलिये, विशाल मोरे, खुशाल नेमाडे, अविनाश पाचपोर, वसिमोद्दीन, एजाज अहेमद, अनिल राठोड, लिलाधर खंडारे, धिरज वानखडे, आकाश मानकर, अभिषेक पाठक, मोहम्मद अमीर, अशोक सोनवणे व चालक पो. अंमलदार अक्षय बोबडे, प्रशांत कमलाकर, विजय कबले यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

11 − two =