पोलीस अधीक्षकांनी निवडणुक तयारी संबंधाने पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांचा आढावा घेवुन दिले सर्व ठाणेदारांना निर्देश.

पोलीस अधीक्षकांनी निवडणुक तयारी संबंधाने पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांचा आढावा घेवुन दिले सर्व ठाणेदारांना निर्देश.

*अकोला प्रतिनिधी गुलाम मोहसीन*

आज दिनांक २६/०३/२०२४ रोजी, मा. पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली अकोला जिल्हयातील पोलीस स्टेशन, शाखा प्रभारी यांची निवडणुक तसेच आगामी सण उत्सव संबंधाने नियोजनाबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी १०.३० वा पोलीस अधीक्षक कार्यालय विजय हॉल येथे आढावा बैठकी दरम्यान आगामी निवडणुक संबंधाने तपासणी समितीच्या आदेशानुसार शस्त्रे जमा करण्याचे निर्देशाचे कशा प्रकारे पालन केले गेले याबाबत आढावा घेतला असता अकोला जिल्हयात ५३३ शस्त्र परवानाधारक यांनी त्यांचे शस्त्र जमा केले.

आगामी निवडणुक संबंधाने पकड वॉरंट व पाहिजे फरार विशेष मोहिम राबवुन जिल्हयातील २३८ पकड वॉरंट तामील करण्यात आले आहे व पाहिजे/फरार आरोपी संबंधाने जिल्हयात ०१ पाहिजे आरोपी यास अटक करण्यात आली आहे. तसेच एकुण ४९ अवैध शस्त्र बाळगणाऱ्यां विरूध्द कारवाई करण्यात आली आहे. अवैध दारूच्या दोन मोहिम राबवुन एकुण ५६३ केसेस करण्यात आल्या आहेत.

निवडणुक अनुषंगाने जिल्हयातील सिमेवर ०९ चेक पोस्ट लावण्यात आले आहेत, बेकायदेशीर कृत्य रोखण्यासाठी एफएसटी २४, एसएसटी १७ आणि क्युआरटी ०२ असे पथक नेमण्यात आले आहेत. सण उत्सव व निवडणुक दरम्यान कायदा व सव्यवस्था राखण्याचे दृष्टिकोणातून सिमा सुरक्षा दलाच्या तुकडीसह एकुण ०४ ठिकाणी रूट मार्चचे आयोजन करण्यात आले आहे. बंदोबस्ताचे दृष्टिकोणातुन राज्य राखीव पोलीस बल यांचे ०२ कंपनी व अतिरिक्त मनुष्यबळाची मागणी केली आहे.

जातीयवादी रिपोर्ट वरून ६५ इसमांवर व इतर ९८२ इसमांवर कलम १०७,११० जाफी प्रमाणे प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. अकोला जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी वेळोवेळी विविध उपाययोजना तसेच प्रतिबंधक कारवाई करण्या बाबत तसेच गाव भेटी देवुन कोर्नर मिटींग चे आयोजन करण्याबाबत निर्देश देण्यात आले व आज माहे फेब्रुवारी २०२४ मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारे ६४ पोलीस अधि/अंमलदार यांना प्रशस्तीपत्र देखुन पोलीस अधिक्षकांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

three × three =