Ajahn Siripanyo : वडिलांचे 40 हजार कोटींचे आर्थिक साम्राज्य धुडकावून का बनला तो मुलगा संन्यासी?

Ajahn Siripanyo वडिलांचे 40 हजार कोटींचे आर्थिक साम्राज्य धुडकावून का बनला तो मुलगा संन्यासी ? त्याचे वडील 40 हजार कोटी रुपयांचे आर्थिक साम्राज्याचे मालक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आयपीएल मधील सीएसके या टीमचे मालक.पण कोट्याधीश असलेल्या वडीलांच्या या  मुलाने आपल्या वडिलांचे आर्थिक साम्राज्य दूर सारून आणि आधुनिक ऐश आणि आराम सोडून जगात सन्यासी जीवन व्यतीत करण्याचा निर्णय घेतला.मलेशिया येथील या कोट्यावधी रुपयांच्या आर्थिक साम्राज्याचे मालक असलेल्या व्यक्तीचे नाव आनंद कृष्णन असून त्यांच्या मुलगा असलेल्या वेन अजहन सिरीपान्यो याने आपल्या वयाच्या 18 व्या वर्षीच वडिलांचे  40 हजार कोटींचे साम्राज्य धुडकावून संन्यासी होण्याचा निर्णय घेतला.विशेष म्हणजे वडील आनंद कृष्णन हे मलेशियातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे उद्योगपती आणि तेथील दूरसंचार क्षेत्रातील ये दिग्गज आहेत. सिएसके संघाचे ते मालक आहेत.पण तरीही वेन अजहन याने सन्यासी जीवनाचा मार्ग पत्करला.सध्या तो एका बौद्ध मठामध्ये संन्यासी बनवून अध्यात्मिक जीवनाचा लाभ घेत आहे.

वेन अजहन सिरीपान्यो ने वडिलांची 40 हजार कोटींची अफाट संपत्ती अन आलिशान आयुष्याचा त्याग केला.

मलेशियात दूरसंचार क्षेत्रात दिग्गज असलेले आनंद कृष्णन यांचा वेन अजहन सिरीपान्यो मुलगा असून त्याला आधुनिक सोयी सुविधांची काहीच कमी नव्हती मात्र तरीही वेन अजहन सिरीपान्यो ने आपल्या वडिलांची 40 हजार कोटींची अफाट संपत्ती आणि आलिशान आयुष्य सोडून संन्यासी होण्याचा निर्णय घेतला.विशेष म्हणजे त्याचे वडील आनंद कृष्णन हे यापूर्वी दूरसंचार कंपनी एअरसेलचे मालक होते,तर दुसरीकडे आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्ज संघाचा स्पॉन्सरशिप त्यांच्याकडे होतं.याशिवाय त्यांचे सॅटॅलाइट,मीडिया, तेल, वायू आणि रिअल इस्टेट क्षेत्रात त्यांचं साम्राज्य पसरलेले आहे.तर दुसरीकडे वेन अजहन सिरीपान्योची आई एम सुप्रिंदा चक्रबन ह्या थायलंडच्या राजघराण्याशी संबंधित आहेत.मलेशिया मधील मीडिया रिपोर्टनुसार कोट्याधीश वडिलांचा मुलगा वेन अजहन सिरीपान्यो ने आपल्या वयाच्या 18 वर्षीं संन्यास घेतलाय.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

माहितीनुसार वेन अजहन सिरीपान्यो याने सन्यासी जीवनासाठी आपली मातृभूमी असलेल्या थायलंडला पसंत केले.तेथे जाऊन त्याने एका बौद्ध मठाला भेट देवून तेथेच भिक्षू होण्याचा निर्णय घेतला. यासाठी व्हेन ने अध्यात्मिक अनुभव घेतले आणि दीर्घ तपानंतर तो बौद्ध भिक्षू बनला.तो आपला आलिशान आयुष्य सोडून आता तो थायलंड मधील जंगलात असलेल्या या बौद्ध मठात एक भिक्षूकाचे आयुष्य जगत आहे.विशेष म्हणजे बौद्ध धर्मात एक सिद्धांत आहे यात कौटुंबिक प्रेमाच्या महत्त्वावर जोर देण्यात आला आहे,त्यामुळे या सिद्धांताचे पालन करत आपल्या कुटुंबालाही वेळ देतो. संन्यासी जीवन जगताना आपल्या आवश्यकतेनुसार सिरिपॅन्यो कधी कधी आपल्या जुन्या जीवनशैलीकडेही परतो. कुटुंब आणि आपल्या आई वडिलांच्या भेटण्यासाठीही वेळ काढतो.

असं होत बालपन.

माहितीनुसार वेन अजहन सिरीपान्योबद्दल म्हटलं जातं की त्यांचं बालपण ब्रिटनमध्ये गेले.त्यांना दोन बहिणींनी आहेत. बालपणापासून त्यांना इंग्रजी, तामिळ आणि थाईसह  एकूण 8 भाषा बोलता येतात. बालपणीपासून त्यांचे संगोपन एश आरामात गेले.उच्च शिक्षण झाले सोबतच त्यांना विविध संस्कृतींचे ज्ञान आणि जीवनाकडे पाहण्याचा स्वतंत्र दृष्टीकोन होता, यात ते युवावस्थेतच ते बौद्ध धर्माच्या शिकवणींकडे आकर्षित झाले.असे म्हटले जाते की,एकदा ते इटलीमध्ये कृष्णनला भेटण्यासाठी खाजगी जेटने गेले होते.तेथे त्यांनी पेनांग हिल येथे आध्यात्मिक रिट्रीटमध्ये सहभाग घेतला.आणि यानंतर त्यांच्या वडिलांनी त्यांच्या सोयीसाठी थेट पेनांग हिल खरेदी केला होता.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

17 − 1 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.