Airtel, Jio New Year Offer : Jio,Airtel ची हॅप्पी न्यू इयर ऑफर काय आहे? बाजारात आणले जबरदस्त नवीन रिचार्ज प्लान.
देशातील टेलिकॉम क्षेत्रात खूप मोठ्या कंपन्या असलेल्या रिलायन्स जिओ आणि एअरटेल या कंपन्यांनी आपल्या ग्राहकांसाठी नवीन वर्षात नवीन आणि जबरदस्त रिचार्ज प्लान आणले आहे. विशेष म्हणजे या रिचार्ज स्मार्टफोन युजेस करून मोठा प्रतिसाद सुद्धा मिळत आहे. दोन्ही कंपनी आपल्या ग्राहकांसाठी वेळोवेळी स्वस्त आणि आकर्षक रिचार्ज आणतात.
आता नवीन वर्षासाठी आपल्या ग्राहकांना नव्या वर्षाची भेट म्हणून या टेलिकॉम कंपन्यांनी नवीन वर्षापूर्वीच,नवीन आणि फायदेशीर असे रिचार्ज प्रीपेड प्लॅन बाजारात लॉन्च केली आहे.यामुळे युजर्सना मोठा फायदा होणार असून,जिओ टेलिकॉम आणि एअरटेल टेलिकॉम चे नवीन रिचार्ज प्लान कोणते आहेत आणि याचा काय फायदा मिळणार याबाबत जाणून घेऊ या…
New Year चे खास Recharge Plans.
देशात रिलायन्स जिओ आणि एअरटेल या दोन्ही कंपन्यांकडून नवीन वर्षापूर्वीच आपल्या युजर्स साठी खास रिचार्ज प्लान आणले आहे. यात रिलायन्स जिओ कंपनीने फक्त 2025 रुपयात आपला प्रीपेड रिचार्ज प्लान या आठवड्यात बाजारात लाँच केले आहे.
तर दुसरीकडे एअरटेल कंपनीने नवीन रिचार्ज प्लान हा फक्त 398 रुपयांचा आणला आहे.यात रिलायन्स जिओच्या recharge प्लानमध्ये युजर्सना कोणत्याही प्रकारचे ओटीटी (OTT) बेनिफिट्स मिळणार नाही.मात्र एअरटेलच्या नवीन आणि स्वस्त रिचार्ज प्लानमध्ये डिस्ने आणि हॉटस्टार या दोन ओटीटी चे फ्री सब्सक्रिप्शन मिळणार आहे.
Reliance JIO जिओच्या प्लान मध्ये दरदिवशी 2.5 GB डाटा.
रिलायन्स जिओच्या या 2025 रुपयांच्या नवीन प्लान मध्ये युजर्सना दर दिवशी 2.5 जीबी डाटा आणि अनलिमिटेड 5g इंटरनेट स्पीड मिळते. सोबतच ग्राहकांना यातून अनलिमिटेड व्हाईस कॉलिंग ची सुविधा आणि 100 एसएमएस ची सुविधा दर दिवशी मिळणार आहे. या रिचार्ज प्लान ची व्हॅलिडीटी 200 दिवसांची असल्याने jio ग्राहक याच्याकडे आकर्षित होत आहेत.
इतरही खूप फायदे.
रिलायन्स टेलिकॉम ची जिओ कंपनी आपल्या भागीदारी असणाऱ्या कंपन्यांसोबत भागीदारी काही अतिरिक्त फायदे देत आहे या नवीन प्लॅन जिओ युजरला 500 रुपयांचे ए जिओ ( AJIO) डिस्काउंट कूपन सुद्धा दिले जात आहे.
सोबतच 1500 रुपयांचा इझी माय ट्रिप (Ease My Trip) हा डिस्काउंट कूपन सुद्धा ग्राहक मिळवू शकतात. विशेष म्हणजे या रिचार्ज प्लान मध्ये मिळत असलेले अतिरिक्त फायदे आणि सुविधा 11 डिसेंबर 2024 ते 11 जानेवारी 2025 पर्यंत मिळणार आहे. रिलायन्स जिओ द्वारे हा आपल्या युजर साठी न्यू इयर ऑफर म्हणून बाजारात लाँच करण्यात आलेला आहे.
Airtel चा 398 रुपयांचा प्लॅनमध्ये अनलिमिटेड 5G नेटवर्क.
न्यू इयर ऑफर म्हणून एअरटेल टेलिकॉमने बाजारात दूध 398 रुपयांचा रिचार्ज आणला आहे त्यात युजर्सना कंपनीने 5G नेटवर्क सुविधा दिलेली आहे. 28 दिवसांची व्हॅलिडिटी असलेल्या या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हाईस कॉलिंग दर दिवशी 100 एसएमएस आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर डिस्ने + हॉटस्टारचे फ्री सब्सक्रिप्शन युजर्सना मिळणार आहे.